तुम्हाला माहितीय? भारतातील जातीप्रथा संपवण्यासाठी वाघ बकरी चहा सुरू करण्यात आला होता

रोज सकाळी उठून एकत्र चहा पिणारी ही जोडपे म्हणजे ‘वाघ-बकरी’. म्हणुनच वाघ बकरी चहाचे नाव वाघ बकरी आहे. हा जोक कोणाला माहित नाही. विनोदाचा भाग बाजूला ठेवून विचार केला तर आज बाजारात वाघ बकरी चहाचे खुप नाव आहे.

टाटा, हिंदुस्तान युनिलिव्हर यासारख्या चहाच्या बड्या ब्रॅण्ड्सशी देशांतर्गत बाजारपेठेत स्पर्धा करणारी कंपनी कोणती? उत्तर आता अगदी स्पष्ट आहे, अर्थातच ‘वाघ बकरी चाय’! परंतु याच आपल्या वाघ बकरी चहाचा प्रवास सुरू झाला होता दक्षिण आफ्रिकेपासून.

गुजरात टी प्रोसेसर्स ॲण्ड पॅकर्स या कंपनीचा इतिहास १९१९ पासून सुरु होतो. पीयुष देसाईंचे आजोबा नरदास देसाई यांनी अहमदाबादमध्ये १९१९ साली ‘गुजरात टी डेपो’ या नावाने चहाचे दुकान सुरु केले. ‘वाघ बकरी’ चहाचा ब्रॅण्ड त्यांनी १९२५ साली सुरु केला. पण यामागेही एक कथा आहे. भारतात सुरू करण्याअगोदर दक्षिण आफ्रिकेत नरनदासांची मालकीची ‘टी इस्टेट’ होती. पण महात्मा गांधींना तेथे मिळालेल्या पक्षपाती, अवमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी दक्षिण आफ्रिका सोडून भारत हीच आपली कर्मभूमी म्हणून निवडली.

भारतात आल्यावर ही त्याची व्याथा काही वेगळी नव्हती दक्षिण आफ्रिकेत त्यांना जसा वंशवादाचा सामना करावा लागला तसाच भारतातील जातीव्यवस्थेचा. त्यावेळी भारतात अनेकांना जातीवादाचा सामना करावा लागला होता. हाच विचार करून देसाई यांनी आपल्या चहाचे वाघ बकरी नाव ठेवले. आता तुम्ही म्हणालं की याचा जातीव्यवस्थेशी काय संबंध?

त्यावेळी म्हणजेच १९३४ सालाच्या आसपास जातीप्रथा पाळणाऱ्या लोकांचा असा समज होता की वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र जेवण करणे किंवा एकच भांड्यात जेवण हे पाप आहे. सवर्ण लोक दलित समाजासाठी बाहेर वेगळे ताट किंवा कप ठेवायचे. जेणेकरून घरातील भांड्यात कोणत्याही इतर व्यक्तीने जेवू नये.

जातीवादावरून अनेकांना सहन करावं लागायचे हे देसाई यांच्या लक्षात आले. आणि हे बंद करण्याच्या हेतूने देसाई यांनी वाघ आणि बकरी हे एकाच कपात चहा पिताणाचा फोटो आपल्या चहासाठी वापरला. याचा अर्थ आसा होता की वाघ आणि बकरी हे भिन्न जातीचे प्राणी एकत्र येऊन चहा पितात. जातीप्रथा संपावी यासाठी देसाई यांनी हा प्रयत्न केला.

गुजरातमध्ये ‘वाघ बकरी’ हा निविर्वाद, सर्वाधिक खपणारा चहाचा ब्रॅण्ड बनला असून, दरसाल १.५ ते १.८ कोटी किलो ‘वाघ बकरी’ तेथे खपतो. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा आणि अगदी अलिकडे दिल्लीत ‘वाघ बकरी’ने प्रवेश केला असून, सुमारे १,७०,००० किरकोळ विक्री दुकानांमध्ये तो उपलध करण्यात आला आहे. ‘वाघ बकरी’ चहा देशात दरसाल अडीच कोटी किलो विकला जातो, तर टाटा, हिंदुस्तान युनिलिव्हर यांचा चहा प्रत्येकी सुमारे ८ कोटी किलो.

गुजरात टी प्रोसेसर्स ॲण्ड पॅकर्स ही कंपनी आपले उत्पादन ‘वाघ बकरी टी ब्रॅण्ड’ची देशभर विक्री करते. ‘गुजरात टी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीयुष देसाई सांगतात: टाटा टी, ब्रूक बॉण्ड, रेड लेबल इत्यादी चहाचे ब्रॅण्ड देशाच्या बाजारपेठेत प्रस्थापित झालेले असले तरी बाजारात मुसंडी मारली.

बड्या कंपन्यांच्या तुलनेत आम्ही छोटे असलो तरी आणि ‘वाघ बकरी’ ब्रॅण्ड देशात तिसऱ्या क्रमांकावर असला तरी आमच्या चहाची विशिष्ट चव (अन्मॅच्ड फ्लेवर) आणि त्यातील सातत्य यामुळे नव्या बाजारपेठांमध्ये नवे ग्राहक मिळविणे शक्य झाले आहे.

बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढविण्यासाठी ‘वाघ बकरी’ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पधेर्त उतरली आणि त्यांना त्यात यशही मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रामाणिक आणि अनुभवी चहा संपत्ती मालक म्हणून महात्मा गांधींकडून काही मौल्यवान वस्तू आणि प्रमाणपत्र वगळता काहीच नसताना भारतात परत जाण्यास भाग पाडले.

भारतात आल्यानंतरही देसाई यांनी कष्टाने आणि जिद्दीने नाव कमवले आहे. नरदास देसाई यांच्या तीन मुलांनी यांनी त्यांच्या वडिलांच्या मागे लागून या व्यवसायात प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या 

भाजपला खिंडार! एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

झोपेत घोरण्याची सवय आहे धोकादायक, ‘या’ आजारांना देताय तुम्ही निमंत्रण

तुम्हाला माहितीये का तोंडात विरघळणारा कबाब कसा बनवतात, जाणून घ्या रेसिपी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.