तौत्के वादळाचा तडाख्यात अवघ्या 10 सेकंदात पत्ताच्या बंगल्यासारखे कोसळले घर; पाहा व्हिडीओ

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तौत्के चक्रीवादळ आले आहे. या चक्रीवादळाने रौद्र रूप घेतल्याचे दिसून आले आहे. केरळमध्ये पण या चक्रीवादळाचा परिणाम दिसत असून तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

या चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. समुद्र या वादळामुळे खवळला असून मोठ्या प्रमाणावर लाटा पण समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकताना दिसून येत आहेत.

तौत्के वादळाचा परिणाम किनारपट्टीवरील भागात पण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. केरळमधील किनारपट्टीच्या भागातील कासारगोड येथे एक बंगला पात्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आहे.

 

त्या बंगल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात पण मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की एक बांगला कसा १० सेकंदमध्ये जमीनदोस्त झाला आहे.

कासारगोड येथील समुद्र किनाऱ्यावर बांगला होता. पाहता पाहता तो बंगला जमीनदोस्त झाला आहे. केरळ राज्यासोबतच दक्षिणेकडील राज्यांना पण मोठ्या प्रमाणावर या वादळाचा फटका बसला आहे. या चक्रीवादळाचा पश्चिमेकडील समुद्र किनारपट्टीवर पण वादळाचा परिणाम जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

चक्रीवादळामुळे मुंबई, कोकण, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि लक्षद्वीप या ठिकाणी तुरळक ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच वादळी वारे पण ८० ते ९० किमी वेगाने वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण कोकण व गोवा या पट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या
शहीद जवानाच्या कुटुंबासाठी गावाने दाखवली कृतज्ञता; एका रात्रीत उभे केले १ लाख ९१ हजार

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची परिस्थिती बिकट; ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाने गाठली मुंबई

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडच ‘लॉकडाऊन लग्न’, म्हणतेय ही तर नवीन सुरवात..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.