१० वीत असताना बलात्कार करुन गर्भवती केलं; आरोपीला शिक्षा मिळाल्यानंतर तरुणीला करायचंय त्याच्याशीच लग्न

केरळमध्ये शनिवारी एक विचित्रच घटना बघायला मिळाली आहे. बलात्काराची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीसोबत लग्न करण्साठी पिडीत तरुणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतची सुनावणी सोमवारी होईल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

आरोपीला २०१९ मध्ये गुन्हेगार ठरवण्यात आले होते. त्यानंतर आरोपीला न्यायालयाने २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. तसेच आरोपी हा एक पादरी होता. त्यामुळे त्याला त्या पदावरुनही हटवण्यात आले होते.

आरोपीने पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर पीडित तरुणी गर्भवती झाली होती. त्यामुळे चर्चने आरोपीला सर्व पदांवरुन बरखास्त केले होते. या आरोपीचे नाव रॉबिन वडक्कुमचेरी असे आहे.

२०१६ मध्ये पीडिता १० वीची परीक्षा देऊन पादरी जवळ पोहचली होती. इथे पीडिता डाटा एंट्रीचे काम करत होती. दुपारच्या वेळी जेव्हा पीडिता एकटी होती, तेव्हा आरोपीने तिला रुममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच ही गोष्ट कोणाला सांगू नको, असेही सांगितले होते.

पीडित तरुणीने या बलात्काराबाबत कोणालाही सांगितले नाही. ती रोज शाळेत जात होती. तसेच रोज स्थानिक चर्चमध्येही जात होती. पण बलात्कारामुळे ती गर्भवती झाली होती. ७ फेब्रुवारीला तिचे पोट अचानक दुखायला लागले. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयात तरुणीची तपासणी केल्यानंतर तरुणी गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर तरुणीने बाळाला जन्मही दिला. त्यानंतर पीडित तरुणीने आपल्या सोबत जे काही घडले ते आपल्या आईला सांगितले.

कुटुंबाने याची तक्रार केली तेव्हा आरोपीने रुग्णालयाचा सर्व खर्च दिला. २०१७ मध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती, पण आता तरुणीने आरोपीशी लग्न करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पांड्या बंधूंनी मुंबईत घेतले ३० कोटींचे घर; एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढत होते
राज कुंद्राच्या कंपनीत पुरुषांचं देखील शोषण होत; ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना खांद्यावरच जावं लागेल, खांदेकरी घेऊन या”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.