सीरम इंस्टीट्यूटमध्ये तीन कोटी कोरोना लशी तयार; ‘या’ दिवशी येणार बाजारात 

मुंबई | कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लशींची सर्वांना प्रतीक्षा असून पुण्याच्या आघाडीच्या सीरम इंस्टीट्यूटने आतापर्यंत सुमारे तीन कोटी लशींचे उत्पादन तयार केले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील ‘क्लिनिकल ट्रायल’च्या निष्कर्षाची प्रतीक्षा असून त्यानंतर विक्रीसाठी परवानगी मिळणार आहे.

पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटमध्ये लशींच्या उत्पादनाची काय स्तिथी आहे. ही बहुप्रतीक्षित लस बाजारात कधी येणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सीरम इंस्टीट्यूटला भेट देऊन तेथील व्यवस्थापन आणि शास्त्रज्ञांशी चर्चा केली. त्या चर्चेदरम्यान लशींच्या उत्पादनाची माहिती समोर आली.

त्या वेळी ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला देखील उपस्थित होते. जगातील एकूण लशींच्या उत्पादनाच्या तुलनेत सुमारे ७० टक्के लशींचे उत्पादन हे एकट्या सीरम इंस्टीट्यूटमध्ये घेण्यात येते. कोरोना प्रतिबंधन लशींच्या ‘सीरम’च्या दोन चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

तसेच तिसरी चाचणी सुरु आहे. त्या चाचण्यांच्या निष्कर्षांनंतर त्या लशींची विक्री सुरु होईल. सध्या सीरम इंस्टीट्यूटने सुमारे तीन कोटी लसींचे उत्पादन केले आहे. ही लस उत्पादन तसेच चाचणीसाठी ‘एफडीए’ने यापूर्वीच परवानगी दिली.

मात्र आता तिसरी चाचणी झाल्यानंतर ही लस बाजारात येण्यासाठी विक्रीची परवानगीला विलंब होऊ नये अशी अपेक्षा आहे. यासाठी संस्थेला भेट देऊन त्यांच्या तयारीची माहिती जाणून घेतली आहे. चाचणीनंतर तातडीने कंपनीला ‘इमर्जन्सी लायसन्स’ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी माहिती ‘एफडीए’चे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
तरुणपणी त्यांचा साखरपुडा मोडला म्हणुन ब्रम्हचारी राहिले पण कोरोनाने त्यांचे डोळे उघडले
मंदिर आणि प्रार्थनास्थळं कधी उघडणार?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत
आणीबाणी लादणार नाही! फटाक्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.