लस घेताना फालतू नाटकं करणाऱ्या मुलीला डाॅक्टरांनी झापले, म्हणाले चल निघ इथून..;पहा हिडीओ

सध्या देशात १८ वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जात आहे. असे असले तरी लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेकांना लस मिळत नाही. असे असताना लस घेतानाचा एका मुलीचा एक विडिओ सध्या समोर येत आहे.

या व्हिडिओमध्ये एक मुलगी लस घेत आहे, मात्र तिला इंजेक्शनची मोठी भीती वाटत आहे. यामुळे डॉक्टर देखील तिच्यावर वैतागले आहेत. ती मुलगी लस घेण्यापूर्वीच मम्मी मम्मी करत आहे.

सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. तिने पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला आहे. या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र या मुलीने सर्वांचा खोलंबा केला.

इंजेक्शन घेऊन डॉक्टर जवळ आले की ही मुलगी जोरात ओरडत होती. आणि एक मिनिटं थांबा असेही बोलत होती. हे सर्व पाहून डॉक्टरांना राग अनावर झाला होता. इतर लोकं ताटखळत रांगेत उभे होते. अनेकांना कामावर जायचे होते, मात्र या मुलीने खूप वेळ घालवला.

या घडलेल्या प्रकारामुळे सर्वजण वैतागले होते. अखेर एका व्यक्तीने तिला धरून बसवले. आणि लस दिली, लस देत असताना देखील ही मुलगी इंजेक्शनला घाबरून मम्मी मम्मी बोलत होती. काहीजण रांगेत उभे राहून हसत देखील होते.

लस दिल्यानंतर लगेच डॉक्टर तिला निघून जा म्हणाले. एक वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघून अनेकांना हसू देखील आले आहे.

ताज्या बातम्या

महिलांच्या शरीरातील ही तीन अंगे जी उघड करतात त्यांची सर्व रहस्ये; जाणून घ्या..

बाबा तु लवकर घरी ये, तुझी खुप आठवण येतेय; क्रिकेटपटूच्या लेकीनं काढलं मन हेलावून टाकणारं चित्र

जुगाड! लॉकडाऊनमुळे चक्क विहीरीत लागलं लग्न, पाहा अनोख्या लग्नसोहळ्याचा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.