लसीकरणाचं टेंशन मिटलं; रशियाच्या ‘या’ नव्या लशीचा एक डोस घेतला तरी काम फत्ते होतय

भारतामध्ये सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. यापुढे पण अशीच लाट राहणार असून परत येणाऱ्या लाटेपासून वाचायचे असेल तर लसीकरण करून घेणे गरजेचे झाले आहे. स्फुटनिक लाईट लसीसंदर्भात एक सकारात्मक बातमी आल्याची माहिती मिळाली आहे.

रशिया देशामध्ये स्फुटनिक लस विकसित करण्यात आली आहे. रशियाच्या मते या लसीचा एक डोस घेणे पण पुरेसे असून त्यातून कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. स्फुटनिक लाईट असे या लसीचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

रशिया देशामध्ये स्फुटनिक लाईट लसीचा एक डोस पुरेसा असल्याचे सांगण्यात आले आहे. कोविड १९ रोगाच्या विरुद्ध ही लस प्रभावशाली असून तिचा उपाय ९७.६ टक्के पडत आहे. ३.८ दशलक्ष लोकांच्या आकडेवारीवरून ही माहिती पुढे आली आहे.

भारतामध्ये या लसीचे १.५ डोस मिळाले असून भविष्यात पण तेवढेच डोस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने स्फुटनिक लाईट या लसीच्या एक डोस वापरण्यास ६ मे २०२१ ला परवानगी देण्यात आली आहे.

या लसीची किंमत १० डॉलर्स पेक्षा कमी असून कोरोनाविरुद्ध जगात पहिली रजिस्टर्ड होण्याचा मान याच लसीला मिळाला आहे. आरडीआयएफने एका निवेदनात म्हटले आहे: “स्पुटनिक लाइट लस दिल्यानंतर 28 दिवसानंतर घेण्यात आलेल्या विश्लेषणात्मक आकडेवारीनुसार 79.4 टक्के या लसीची कार्यक्षमता दिसून आली.”

रशियाच्या लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ५ डिसेंबर २०२० पासून १ एप्रिल २०२१ पर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. स्फुटनिक लाईट या लसीला भारतात कधी मान्यता मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.