लसीचे सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करणे पडेल महागात, जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान

नवी दिल्ली । देशात सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे या लसीकरणाला हवी तशी गती मिळत नसली तरी महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण झाले आहे मात्र असे असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे लसीकरण केल्यानंतर अनेक जण कोरोना लस घेतलेले सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करत आहेत मात्र याचा मोठा तोटा आपल्याला सहन करावा लागू शकतो हे अनेकांना माहित नाही

याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर सायबर दोस्त अकाऊंटवरून एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. यामध्ये हे ट्विटर हँडलर वापरकर्त्यांना सायबर सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटीबद्दल सांगते. हे हँडल वापरकर्त्यांना लसीकरण प्रमाणपत्र सामायिक करण्यास प्रतिबंधित करीत आहे.

यामध्ये सांगितले गेले आहे की, तुमचे लसीकरण प्रमाणपत्र तुमच्या माध्यमातून शेअर करणे धोकादायक ठरू शकते. या माहितीच्या आधारे फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमची फसवणूक करू शकतात.

यामुळे आता इथून पुढे काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही कोरोना लसीकरण प्रमाणपत्र शेअर केले तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. याबाबत सरकारने सोशल मीडियावर प्रमाणपत्रे शेअर करणाऱ्या युजर्सना याचा इशारा दिला आहे.

यामध्ये आपल्याला हे माहित नाही की आपण आपली किती माहिती शेअर केली आहे. यामुळे आपल्या या माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. यामुळे लसीकरणाचे प्रमाणपत्र कुठेही शेअर न करण्याची खबरदारी आपण घेतली पाहीजेल, नाहीतर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

अनेकांनी लसीकरण केल्यानंतर त्याचे सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर केल्याचे दिसून आले आहे. यामुळे ते धोकादायक ठरू शकते याबाबत आता सांगितले गेले आहे.

ताज्या बातम्या

बॉलीवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे अक्षय खन्ना आजही आहे अविवाहित, जाणून घ्या कारण..

आई म्हणायचं की राक्षस! प्रियकरासोबत मिळून पोटच्या पोराचा काढला काटा, प्रेमात ठरत होता अडसर

कविता मिश्रा: इनफोसिसमधील नोकरी सोडून सुरू केली चंदनाची शेती, आता कमावतात लाखो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.