तुमच्या भागात लस उपलब्ध आहे की, नाही Whatsapp वर कळणार; ‘ह्या’ नंबरवर फक्त एक मेसेज करा

नवी दिल्ली । सध्या देशात कोरोनाचे रुग्ण अजूनही सापडत आहेत. यामुळे अजूनही अनेक भागात लॉकडाऊन आहे. खूप काही योजना करून देखील कोरोना आटोक्यात आला नाही. लसीकरण देखील सुरू आहे. मात्र लसीकरणाला हवा तसा वेग येत नाही.

लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत आहे. तरीसुद्धा लस आहे की नाही हे समजत नाही. मात्र आता तुमच्या भागातीलच उपलब्ध आहे की नाही हे तुमच्या व्हाट्सअपवर पिन कोड टाकून समजणार आहे आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून हा 9013151515 क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यामुळे आता आपल्याला लस उपलब्ध आहे की नाही हे बघण्यासाठी जास्त हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आता आपण घरबसल्या या नंबरवरून कोरोना लसीची माहिती घेऊ शकतो.

व्हाट्सअपमध्ये या नंबरवर आपला पिन कोड टाकून फक्त सेंड करायचे आहे. त्यानंतर आपल्या परिसरात लसीकरणासंदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. यामुळे आपला त्रास कमी होणार आहे. सध्या लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

यामुळे आता कोरोना लसीकरणाची माहिती घेण्यासाठी आपल्याला विनाकारण कुठेही बाहेर फिरण्याची गरज पडणार नाही. अनेकवेळा रांगेत उभे राहून देखील लस मिळत नाही. यामुळे फक्त या नंबरवर पिनकोड पाठवून आपण लसीची खात्रीलायक माहिती घेऊ शकतो.

लसीच्या नोंदणीनंतर लसीकरणासाठी तुमचा नंबर आल्यास त्याचे अपडेटदेखील या नंबरवर मिळू शकते. यामुळे गर्दी आणि गोंधळाशिवाय लसीकरण होण्यास मदत होणार आहे. याचा अनेकांना फायदा होणार आहे.

राज्यात लस उपलब्ध झाल्यानंतर अनेकांनी ही लस घेण्यास नकार दिला, मात्र आता ही लस परिणामकारक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकजण लसीसाठी पळापळ करत आहेत. यातच केंद्र सरकारने आपल्याला लसीचे डोस कमी दिले आहेत. यामुळे लसीकरणाला वेग येत नाही.

ताज्या बातम्या

काळीज पिळवटून टाकणारी घटना; मुलींनी आईच्या मृतदेहाला दिला खांदा आणि मुखाग्नी

‘अरे बाबा काहीतरी नियम पाळा’, कोरोनाच्या भितीने अजित पवारांनी पुष्पगुच्छ नाकारला

कोरोनाने आपल्या जवळची माणसे गमावली; डॉक्टरांसोबत संवाद साधताना मोदींना आले रडू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.