याला म्हणतात मैत्री! इंजेक्शनला घाबरणाऱ्या व्यक्तीला तीन मित्रांनी जमिनीवर पाडून दिली लस, पहा व्हिडीओ

कोरोना लसीकरण मोहीम संपूर्ण भारतभर राबवली गेली आहे, तरीही काही लोक अजूनही लसीकरणाचे महत्व काही लोकांना कळालेले नाही किंवा काही लोक लस घेण्यासाठी घाबरत आहेत. दरम्यान, काहीजण आहेत जे सुईच्या भीतीने लस घेण्यापासून पळून जात आहेत.

असे बरेच लोक आहेत ज्यांना इंजेक्शन टोचून घेण्याची भीती वाटते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात काही लोक एका व्यक्तीला लस घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, पण सुईच्या भीतीमुळे लस घेण्यापासून तो व्यक्ती पळून जात आहेत.

व्यक्तीला जबरदस्ती लस टोचवण्यात आली
ही 1 मिनिट 20 सेकंदाची व्हिडीओ आहे. एक माणसाला त्याच्या मित्रांनी घट्ट पकडले आहे कारण त्याला सुईच्या भीतीने लसीकरण करायचे नसते. त्या माणसाचे मित्र वारंवार त्याला लस घेण्यासाठी समजवत होते, पण तो अजिबात ऐकत नव्हता.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे जाण्यासाठीही तो घाबरत होता. जेव्हा तो लस घेण्यास अजिबात तयार होत नाही, तेव्हा त्याचे मित्र त्याला घट्ट धरून ठेवतात आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्याची विनंती करतात.

मित्रांनी त्याला जमिनीवर पाडले आणि मग दिली लस
त्याच्या तीन मित्रांनी त्याला जमिनीवर आपटले आणि मग त्याला बळजबरीने लस देण्यात आली. अनिल दुबे नावाच्या पत्रकाराने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि त्याने क्लिपला कॅप्शन दिले की लस मिळवणे किती कठीण आहे!

ट्विटनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमधील लसीकरण केंद्राची आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक लोटपोट झाले आहेत. इंजेक्शन मिळण्याच्या भीतीने मोठा गोंधळ उडाला होता. एका युजरने लिहिले, ‘याला म्हणतात मैत्री, जी क्वचितच दिसते.’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.