लसीचे दोन डोस घेऊनही पद्मश्री विजेत्या डाॅक्टरचे कोरोनामुळे निधन; रूग्णांवर मोफत करायचे उपचार

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांपासून अगदी मोठं मोठ्या सर्वच व्यक्तींचा बळी घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाउंडेशचे प्रमुख पदमश्री डॉ. के के अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

डॉ. के के अग्रवाल यांचे सोमवार दिनांक १७ मेला कोरोनाने निधन झाले आहे. सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास कोरोना संसर्गामुळे त्यांचे निधन झाले आहे. त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रामा सेंटरमध्ये दाखल केले होते.

त्यांची प्रकृती तीन दिवसांपासून बिघडली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी अग्रवाल यांनी कोरोनाचे डोस पण घेतले होते. पण तरीही त्यांना मागच्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.

अग्रवाल यांना जेव्हा कोरोना झाला तेव्हा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. एम्समध्ये दाखल केल्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये पण हलवण्यात आले.

के के अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली होती. त्यांनी २८ एप्रिलला सांगितले होते की त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. डॉ. के के अग्रवाल त्यांच्या व्यवसायामुळे प्रसिद्ध होते.

प्रत्येकाने डॉक्टरांचा चांगुलपणा सर्वानी कोरोना काळात त्यांचा चांगुलपणा पहिला. त्यांनी संकटाच्या वेळी पण हजारो लोकांना मदत केली आहे. त्यांनी आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले होते. कोरोना संकट काळात ते अनेकांसाठी वॉरियर्स ठरले होते. २०१० साली अग्रवाल यांना पदमश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

ताज्या बातम्या
कुली चित्रपटातील हा चिमुकला आठवतो का? आता हा बिझनेस करून कमावतोय करोडो रूपये

अभिनेत्री नोरा फतेहीने पॅलेस्टाईनवरच्या अन्यायाविरोधात उठवला आवाज; चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

रश्मिका मंदानाने मारली पलटी, आधी म्हणाली विराट माझा फेवरेट, पण आता घेतलं दुसऱ्याचं नाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.