मोठी बातमी! १ मे पासून होणारे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण रद्द, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे १८ ते ४५ वयोगटातील सर्वांना लस देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र या निर्णयाला आता ब्रेक लागणार आहे. हे लसीकरण १ मे पासून होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वांना आता लस मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचे डोस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

नाईलाजास्तव हा निर्णय घेत असलो तरी लवकरच नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत. त्यामुळे माझं आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने घ्यावे लागणार आहे.

आधी नोंदणी करूनच लस घ्यावी कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे, असे यावेळी राजेश टोपे म्हणाले. केंद्र सरकारने लस अगोदरच बुक केल्याने हा घोळ निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

आफ्रिकेतील या पठ्ठ्याने रामदेव बाबालाही दिली टक्कर, शरीराची अशी घडी करतो की..; पाहा व्हिडीओ

ठाण्यातील आग लागलेल्या हाॅस्पीटलला भेट द्यायला गेलेल्या भाजपच्या सोमय्यांना हाकलले

विवाहीत अभिनेता रवी किशनच्या प्रेमात पडली होती नगमा; रवीच्या पत्नीला समजल्यावर मात्र…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.