नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच आपल्याला कोरोना लस मिळेस असे वक्तव्य केले असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष बाब ही आहे की सध्या चाचणी स्तरावर असलेली कोवॅक्सीन लस त्यांनी स्वत:ला टोचून घेतली होती.
लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. या लसीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विज यांनी ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.
ट्विट करत त्यांनी म्हटले की ‘मला कोरोनाची लागण झाली आहे, मी अंबाला कँट इथल्या सामान्य रुग्णालयात दाखल झालो आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. या घटनेनंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
२० नोव्हेंबरला अनिल विज यांनी ही लस स्वत:ला टोचून घेतली होती. कोवॅक्सीन लस भारत बायोटेक आणि हिंदुस्थानची वैद्यकीय संशोधन परिषद मिळून बनवत आहेत. विज यांनी या लसीच्या चाचणीसाठी लागणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये आपलेही नाव असेल असे जाहीर केले होते.
भारतात तयार होत असलेल्या कोवॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यामुळे लस लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र या घटनेनंतर आता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.