VIDEO: धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला; काचा फोडल्या अन्…

पश्चिम बंगलाचा विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणूकीत निकाल ममता बॅनर्जी यांच्याकडून लागला आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

अशात तृणमुल काँग्रेसच्या बाजूने निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहे. यामध्ये काही लोकांचे मृत्युही झाले आहे. असे असताना आता केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्हि मुरलीधरण यांच्यावर लोकांनी हल्ला केला आहे.

या घटनेचा व्हिडिओ खुद्द व्हि मुरलीधरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या ताफ्यावर काही लोकांनी हल्ल्या आहे. त्यामुळे त्यांना दौरामध्येच सोडून ताफा परत फिरवावा लागला आहे.

व्हिडिओमध्ये काही लोक व्हि मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला करताना दिसत आहे. यावेळी लोकांनी लाकडाने गाडीच्या काचाही फोडल्या आहे. लोक जास्त आक्रमक झाल्याचे दिसून आल्याने त्यांना अर्ध्यातच तो दौरा सोडून परत जावे लागले आहे.

पश्चिम मिदनापुरमध्ये तृणमुलच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला आहे. त्या लोकांनी माझ्या गाडीच्या काचा फोडल्या, माझ्यासोबतच्या असलेल्या कर्मचाऱ्यांवरही त्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे आम्हाला दौऱ्यावरुन परत जावे लागले आहे, असे मुरलीधरन यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकणावर अनेक भाजप नेत्यांनी तृणमुल काँग्रेसवर टिका केली आहे. जर बंगालमध्ये मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला होत असेल, तर बंगालमध्ये कोण सुरक्षित आहे? आम्ही या घटनेचा निषेध करतो, दोषींवर कारवाई करण्यासाठी विशेष पावले उचलण्याची गरज आहे, असे भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कॉमेडी क्विन भारती सिंहची झाली फजिती; पहा व्हिडिओ
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक असेल; शास्त्रज्ञांनी वर्तवली शक्यता
आयपीएलच्या समाप्तीनंतर विराट कोहली युवा सेनेसोबत उतरणार कोरोना लढ्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.