उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh0 आग्रा येथे महापालिकेच्या(Muncipal) आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्याने आठ वर्षांत कोट्यवधींची मालमत्ता मिळवली आहे. या कर्मचाऱ्याला दरमहा पाच हजार रुपये पगार मिळत होता. पण आता तो २३८ कोटींचा मालक झाला आहे. आग्रा महापालिकेतील या कर्मचाऱ्याचे नाव राकेश बन्सल असे आहे. सध्या या महापालिकेच्या माजी कंत्राटी(Temporary) कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.(uttar prdesh muncipal worker have 238 corer rupees property)
या कर्मचाऱ्याच्या विरोधात अनेकवेळा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील करण्यात आल्या, पण त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. पाच हजार रुपये पगार मिळणाऱ्या या कर्मचाऱ्याकडे २३८ कोटींची मालमत्ता आहे, असा आरोप सपोर्ट इंडिया सोसायटीचे अध्यक्ष आणि अधिवक्ता सुरेशचंद सोनी यांनी केला आहे.
महापालिकेचे माजी कंत्राटी कर्मचारी राकेश बन्सल हे सिकंदरा येथील राधा नगर कॉलनीतील रहिवासी आहेत. २००८ च्या सुमारास ते महापालिकेत आउटसोर्सिंग कर्मचार्याच्या रूपात कार्यरत होते. त्यांना दरमहा पाच हजार रुपये पगार मिळत होता. पण भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना काढून टाकण्यात आलं, तेव्हा त्यांचा पगार १९ हजार रुपये होता.
पण आग्रा महापालिकेत काम करत असताना राकेश बन्सल यांनी आतापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता मिळवली आहे. अधिवक्ता सुरेशचंद सोनी यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. सुरेशचंद सोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “उत्तर प्रदेशातील आग्रा येथील महापालिकेचे आउटसोर्सिंग कर्मचारी राकेश बन्सल यांनी कोट्यवधींची संपत्तीं मिळवली आहे.
या कर्मचाऱ्याच्या विरोधात अनेकदा तक्रारी देखील करण्यात आल्या. पण कारवाईच्या फाईलवर कोणीच पुढील चौकशी केली नाही. फाईल तशाच धूळ खात पडल्या आहेत. त्या कर्मचाऱ्याविरोधात कोणीही कारवाई करू नये अशी त्याने सेटिंग्ज केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. आग्रासह अन्य जिल्ह्यांमध्ये या कर्मचाऱ्याच्या नावावर डझनभर मालमत्ता आहेत. याशिवाय या कर्मचाऱ्याकडे अनेक लक्झरी वाहने देखील आहेत.
राकेश बन्सल हे २००८ साली महापालिकेत आउटसोर्सिंगवर रुजू झाले होते. २०२० पर्यंत राकेश बन्सल हे महापालिकेत महापालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक पदावर होते. पण सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आलं. या कर्मचाऱ्याकडे दहाहून अधिक प्लॉट्स, नोएडातील मॉल, तीन वाहने, रायफल आणि इतर मालमत्ता आहेत. या सर्व संपत्तींची मिळून किंमत २३८ कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :-
डाएट प्लॅनमध्ये बदल करून दिला चक्क मृत्यूला चकवा; डॉक्टर म्हणाले होते ८ महिन्यात होईल मृत्यू
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ पोस्टवर भडकला अभिनेता, म्हणाला, ‘…कुत्रबी ईचारत नाय’
स्वस्तात दर्जेदार शिक्षण! वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही, आनंद महिंद्रांनी घेतला मोठा निर्णय