Share

लग्नानंतरही पाठ न सोडणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने दिली भयंकर शिक्षा; घरी बोलावून केले असे काही की..वाचून अंगावर काटा येईल

Robin-Murder.j

उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) नोएडा(Noida) शहरामध्ये प्रेमसंबंधातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणाच्या माजी प्रेयसीने त्याला घरी बोलावले होते. त्यानंतर प्रेयसीच्या वडिलांनी आणि आईने मिळून त्या तरुणाची हत्या केली. त्यानंतर प्रेयसीच्या कुटूंबियांनी त्या तरुणाचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.(uttar prdesh girlfriend murdered  boyfriend)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीच्या लग्नानंतरही हा तरुण तिला मेसेज आणि कॉल(Call) करून त्रास देत होता. त्यामुळे प्रेयसीच्या कुटूंबियांनी मिळून या तरुणाची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये प्रेयसीचे आई-वडील आणि इतर आरोपींचा देखील समावेश आहे.

सुरजपूर ठाण्याचे एसएचओ अवदेश प्रताप सिंह या प्रकरणाचा तपास करत आहेत. एसएचओ अवदेश प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबिन आहे सुरजपूरमधील रहिवाशी आहे. २७ फेब्रुवारी रोजी तो अचानक घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर रॉबिनच्या कुटूंबियांनी सुरजपूर पोलिसांकडे जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी रॉबिनचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यावेळी पोलिसांना मोनिकाबद्दल माहिती मिळाली. आणखी तपास केला असता रॉबिन आणि मोनिकाचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. २०१९ मध्ये मोनिकाचा विवाह झाला होता. तरी देखील रॉबिन तिला सतत मेसेज आणि कॉल करून त्रास द्यायचा.

यामुळे मोनिका त्रस्त झाली होती. शेवटी तिने यासंदर्भातील माहिती तिच्या भावाला आणि आईला दिली. त्यानंतर मोनिका आणि तिच्या कुटूंबियांनी मिळून रॉबिनच्या हत्येचा कट रचला. २७ फेब्रुवारीच्या रात्री मोनिकाने रॉबिनला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर मोनिकाच्या भावाने रॉबीनच्या तोंडात बोळा कोंबला.

यानंतर मोनिका आई-वडिलांनी एलईडी केबलने रॉबिनचा गळा आवळून त्याची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात मोनिकाच्या आई-वडील आणि तिघा भावांना अटक केली आहे. सुरजपूर ठाण्याचे पोलीस सध्या या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण नोएडा शहरात केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब, कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं’
“आज पुण्याच्या आधी मुंबई मेट्रो सुरू झाली असती पण पिता पुत्राच्या अहंकाराने हे होऊन दिले नाही”
बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी फडणवीसांना द्यावी, भाजपाची मागणी, शिवसेनेच्या भूमिकेकडे राज्याच लक्ष

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now