Share

UPSC पास झाला! सर्वत्र आनंदोत्सव, मिठाई वाटली, चॅनेल्सला मुलाखती दिल्या; नंतर भयंकर सत्य आले समोर

यूपीएससी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या यूपीएससी परीक्षेत मुलींनी दिमाखदार यश मिळवत वर्चस्व गाजवले आहे. तसेच यूपीएससी परीक्षेत यश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे.(uttar pradesh uttam bhardwaj not clear upsc exam )

मुरादाबाद शहरातील उत्तम भारद्वाज १२१ वा क्रमांक मिळवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर उत्तम भारद्वाजच्या(Uttam Bhardwaj) कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्याचे कौतुक केले. मुलगा आयएएस झाल्याच्या आनंदाने उत्तम भारद्वाजच्या कुटुंबीयांनी संपूर्ण वसाहतीत मिठाईचे वाटप केले. पण त्यानंतर एक वेगळीच बाजू समोर आली.

यूपीएससी परीक्षेत १२१ वा क्रमांक मुरादाबाद शहरातील उत्तम भारद्वाजने मिळवला नसून हरियाणातील सोनीपत परिसरातील उत्तम भारद्वाज या तरुणीने मिळवल्याचे समोर आले. ही बातमी समजताच मुरादाबादमधील उत्तम भारद्वाजला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे उत्तम भारद्वाजला ह्र्दयविकाराच्या झटका देखील आला आहे.

त्यामुळे उत्तम भारद्वाजला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरादाबाद शहरातील उत्तम भारद्वाजने आपला रोल नंबर आणि वडिलांचे नाव न पाहता संपूर्ण कुटुंबाला आणि नातेवाईकांना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. हा संपूर्ण गोंधळ रोल नंबरमुळे झाला असल्याचे समोर आले आहे.

मुरादाबादमधील रहिवासी उत्तम भारद्वाजने आपल्या रोल नंबरचा शेवटचा क्रमांक न पाहता कुटुंबाला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. पण चूक लक्षात येताच उत्तम भारद्वाजने एक पत्र प्रसिद्ध करून सर्वांची माफी मागितली आहे. “माझ्या डायरीमध्ये रोल नंबर लिहिताना माझ्याकडून चूक झाली. त्यामुळे यूपीएससी परीक्षा पास झाल्याची खोटी माहिती सर्व ठिकाणी पसरली. या चुकीसाठी मी सर्वांची माफी मागतो”, असे उत्तम भारद्वाजने पत्रात लिहिले आहे.

या प्रकाराबद्दल माहिती देताना मुरादाबादमधील रहिवासी उत्तम भारद्वाजचे वडिलांनी सांगितले की, “रोल नंबर लिहिताना उत्तमकडून चूक झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे.” उत्तम भारद्वाज हे सध्या दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उत्तम भारद्वाज यांची ही पहिलीच यूपीएससी परीक्षा होती.

महत्वाच्या बातम्या :-
अशोक सराफ शर्टाचे पहिले बटन नेहमी उघडे का ठेवायचे? कारण ऐकून चकीत व्हाल
IPL पाठोपाठ टीम इंडियानेही डावलले, ‘या’ दिग्गज स्टार गोलंदाजाची कारकीर्द जवळपास संपुष्टात
..तोपर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवली जाऊ शकत नाही, पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचा दावा

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now