दररोज रात्री पत्नी दूधातून द्यायची पतीला झोपेच्या गोळ्या; एका रात्री पतीचे डोळे उघडले अन्…

उत्तर प्रदेश | बरेली येथील केंट पोलीस ठाणे क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलीस शिपायाचे एका सराफाच्या पत्नीशी प्रेमसंबध जुळले होते. धक्कादायक बाब म्हणजे ती महिला आपल्या पतीला रोज रात्री दूधातून झोपेच्या गोळ्या देऊन त्या पोलिसासोबत रात्र घालवत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, केंट पोलीस ठाण्याच्या एका भागात पोलीस शिपाई रोज रात्री गस्त घालायचा. तेव्हा सराफाची पत्नी आणि पोलीस शिपायाची ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेमसंबध जुळले. दोघेही एकमेकांच्या एवढे जवळ आले की लैंगिक संबंध ठेवू लागले.

दरम्यान, पोलिसाच्या सांगण्यावरून पत्नीने सराफाला दुधातून झोपेच्या गोळ्या देण्यास सुरुवात केली. पती झोपल्यानंतर सराफाची पत्नी आपल्या प्रियकर पोलिस शिपायाला फोन करून घरी बोलावून घेत असत. पोलिस गस्त सोडून तिच्या घरी रात्र घालवत होता.

असे पडले पितळ उघडे..
एका रात्री सराफाचे पोट बिघडले होते. यामुळे त्याने पत्नीने दिलेले दूध पिले नाही आणि तो झोपी गेला. यानंतर पती झोपल्याचे लक्षात येताच तिने प्रियकराला फोन केला. तो घरी आला अन् नेहमीप्रमाणे त्यांच्यात गप्पा रंगल्या.

नेमकी तेव्हाच सराफाला जाग आली. त्याने या दोघांना आपत्तीजनक परिस्थितीत बेडवर पाहिले. सराफाने दोघांचा शरिरसंबंधाचा व्हिडीओ आपल्या मोबाईमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन करुन त्यांना रात्रीच बोलवून घेतले. पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेला व्हिडीओ दाखवला. यानंतर त्या पोलिस शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकार बाजारभावापेक्षा कमी दरात देताय सोनं, जाणून घ्या काय आहे ही योजना
धक्कादायक! UPSC परीक्षा उत्तीर्ण प्रांजलची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू
कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या शुन्यावर आल्याने कर्मचाऱ्याने लावणीवर धरला ठेका; पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.