उत्तरप्रदेशात कोरोना चाचण्या निगेटीव्ह येण्यामागे आहे सरकारचा हा ‘झोल’; वाचून तुम्हीही हादराल

देशभरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आल्याचे दिसून आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून आले आहे.

उत्तर प्रदेशात मात्र एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला आहे. बरेली येथे असणाऱ्या आरोग्य विभागात आउट ऑफ डेट म्हणजेच अँटीजेन कीटने तब्बल १० हजार कोरोना चाचणी घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. ज्या आऊट ऑफ डेटने कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ज्यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांना शोधून त्यांच्या आरटी पीसीआर चाचण्या घेण्यात येत आहेत.

मात्र आउट ऑफ डेटने ज्या चाचण्या झालेल्या आहेत. त्या सर्वांची अजून पण ओळख पटलेली नाही. या प्रकरणी आरोग्य विभागातील अधिकारी पण काही बोलत नसल्यामुळे जास्त माहिती पण बाहेर येण्यास अडचण निर्माण होत आहे.

सदोष किटचा पुरवठा लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून आरटी पीसीआर चाचण्या घ्या असे सांगण्यात आले. मात्र सदोष अँटीजेन किटचा वापर करायचा की नाही याबद्दल कोणतीच माहिती देण्यात आली नाही.

सदोष किटने ज्या चाचण्या केल्या गेल्या आहेत त्यातील हजारो लोकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, त्या चाचण्यामधील बऱ्याचशा चाचण्या पॉझिटिव्ह येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे.

ताज्या बातम्या
लाॅकडाऊनमध्ये लोकांच्या मदतीसाठी रिलायन्स सरसावले; मोफत काॅल आणि रिचार्ज मिळणार

वा आजी! पुण्यात भाजी विक्री करणाऱ्या आजीने कोरोना रुग्णांसाठी दिले १ लाख रुपये

ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या उपचारासाठी दोघा मित्रांनी दोन दिवसात जमा केले ३० लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.