उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची परिस्थिती बिकट; ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाने गाठली मुंबई

कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशात पण कोरोनामुळे बिकट परिस्थिती ओढवली आहे.

ऊत्तर प्रदेशात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मोहम्मद शमशाद खान यांनी मुंबईत येऊन उपचार घेण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमशाद खान यांनी मुंबईत येऊन उपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा जीव वाचला. ५० वर्षीय मोहम्मद शमशाद खान यांनी त्यासाठी १५०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

मोहम्मद शमशाद खान हे २१ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह ठरले आणि मग त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचे ठरवले. मोहम्मद शमशाद खान यांना बेड मिळाला पण ऑक्सिजन मिळाला नाही.

ऑक्सिजन पण त्यांना उत्तर प्रदेशात वेळेवर मिळत नव्हता. डॉक्टर आणि नर्सने पण हात वर केला आणि मग मोहम्मद शमशाद खान यांनी मुंबईला उपचाराला जाण्याचे ठरवले. मोहम्मद शमशाद खान यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मुंबईत उपचाराला कुटुंबीयांनी हलवले.

मोहम्मद शमशाद खान यांना मुंबईत वेळेवर आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. यावेळी बोलताना मोहम्मद शमशाद खान यांनी म्हटले आहे की, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उत्तर प्रदेशात जेव्हा मी रुग्णालयात होतो तेव्हा एका रात्रीमध्ये मी १६ ते १७ जणांचा मृत्यू झाल्याचे डोळ्यापुढे पहिले.

त्यानंतर मला पण असे वाटायला लागले की मी पण जगतोय की मरतोय. मात्र मला अशा वेळेला डॉक्टर आणि घरच्यांनी धीर दिला. त्यानंतर मला उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले. इथे जवळपास मी १७ ते १८ दिवसांपासून रुग्णालयात आहे, आता मला बरे वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या
कोरोना असतानाही खतरों के खिलाड़ी ११ येणार आपल्या भेटीला; ‘या’ देशात सुरू आहे शुटींग

राहूल गांधींचा राईट हॅंड असलेला महाराष्ट्रातील काॅंग्रेसचा झुंझार नेता काळाच्या पडद्याआड

तुझ्यासारखे लोक देशात आहेत याची लाज वाटते; टीम इंडियाचा क्रिकेटपटू चाहत्यावर भडकला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.