Share

मोठी बातमी! उत्तर प्रदेशातील मदरशांचे सरकारी अनुदान रद्द होणार, योगी सरकारने घेतला निर्णय

उत्तर प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील नवीन मदरशांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही नवीन मदरशाला यापुढे सरकारी अनुदान न देण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.(Uttar Pradesh governemet take big decision about madarsa)

या निर्णयानुसार नवीन मदरशांना अनुदान यादीतून वगळण्यात आले आहे. योगी सरकारने यासंदर्भातील प्रस्ताव मान्य केला आहे. यामुळे आता कोणत्याही नवीन मदरशांना सरकारी अनुदान मिळणार नाही. तसेच नवीन मदरशांना अनुदान यादीतून वगळण्यात येणार आहे. पण जुन्या मदरशांना मिळणारे अनुदान सुरु राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

समाजवादी पक्षाचे सरकार २००३ पर्यंत १४६ पैकी १०० मदरशांना अनुदान देत होते. पण योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी मदरशांची चौकशी करण्यास सुरवात केली. चौकशी दरम्यान अनेक मदरसे दर्जा पूर्ण करत नसल्याचे समोर आले. त्यामुळे योगी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

मागील महिन्यात योगी सरकारने अधिकाऱ्यांना आधुनिक मदरसा योजनेंतर्गत राज्यातील मदरशांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच मदरसा शिक्षकांना ऑनलाइन शिकवण्याच्या पद्धतीमध्ये निपुण बनवण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्याचा निर्णय देखील योगी सरकारने घेतला होता.

उत्तर प्रदेशात मदरसा आधुनिकीकरण योजनेशी संबंधित ७,००० हून अधिक मदरसे आहेत. भारत सरकारचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अंब्रेला योजना राबवत आहे. ही योजना दोन योजनांनी मिळून बनली आहे. या योजनेमध्ये मदरशांचा देखील समावेश आहे.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या म्हणण्यानुसार, ही योजना (SPQEM) ही मदरशांमध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी आखण्यात आली आहे. या योजनेद्वारे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे. मदरशांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
धडाकेबाज टीम डेव्हिड धावबाद झाला अन् स्टेडीयममध्ये अशी किंचाळली सारा तेंडुलकर की सगळे बघतच राहीले…
ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदीर असेल तर ते हिंदूंना दिलेच पाहीजे, कारण…; सपाच्या महीला नेत्यानेच केली मागणी
VIDEO: कंगना राणौतने ‘या’ व्यक्तीला भर पार्टीत केले वारंवार किस, व्हिडीओ पाहून चाहते अवाक

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now