राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपूर(Kanpur) दौऱ्यादरम्यान काल दोन गटांत हिंसाचार झाला. या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच व्हिडिओ फुटेजच्या आधारे इतर आरोपींना देखील अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कानपूर दौऱ्यादरम्यान झालेल्या हिंसाचाराची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. (uttar pradesh cm yogi aaditynath angry on kanpur mob linching accused )
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचार प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसाचार प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तांवर उत्तर प्रदेश सरकारकडून बुलडोझर चालवण्यात येणार आहे. तसेच आरोपींची अनधिकृत संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
हिंसाचार झालेल्या भागात सध्या अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा संपल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक तातडीची बैठक घेतली आहे. या बैठकीला मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा आणि डीजीपी डीएस चौहान उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा आणि डीजीपी डीएस चौहान यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे.
हिंसाचार प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांना फोन करून हिंसाचार प्रकरणाची माहिती घेण्यास सांगितले आहे. तसेच हिंसाचार प्रकरणातील आरोपींसोबत कठोरपणे वागावं, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांना सांगितले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डीजीपीं डीएस चौहान यांना सांगितले की, “दंगलखोरांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच हिंसाचार प्रकरणातील आरोपींवर कडक कलमे लावण्यात यावीत. आरोपींची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. म्हणजे भविष्यात कोणीही अशी दंगल करण्याचा विचार देखील करू शकणार नाही.”
हिंसाचार प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, “कानपूरमध्ये काही लोकांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता हाणामारी सुरू झाली. दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आवश्यक बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.”
महत्वाच्या बातम्या :-
धोनीने संघातून वगळल्यानंतर मी निवृत्ती घेणार होतो पण.., वीरेंद्र सेहवागचे खळबळजनक वक्तव्य
१६९ आमदारांचा दावा हवेत! सरकार बनवायला पाठींबा दिलेले हे तीन आमदार राज्यसभेला भाजपसोबत
…तर टीम इंडियामध्ये माझी निवड कधीच झाली नसती, धोनीचे मोठे वक्तव्य, चाहतेही झाले भावूक






