उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची बिकट स्थिती, यमुनेत तरंगताहेत मृतदेह; यंत्रणाही हादरली

देशात कोरोनाने भयानक परिस्थिती करून ठेवली आहे. उत्तर प्रदेशात पण कोरोनाने वाईट अवस्था करून ठेवली आहे. उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातील एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

हमीरपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या यमुना नदीमध्ये मृतदेह वाहत असताना दिसून आले आहेत. गावकरी पण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना नदीत सोडत असल्याचे छायाचित्रात दिसून आले आहे.

यमुना नदीमध्ये मृतदेह सोडत असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत ते वाहत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवार दिनांक ७ मेला अचानक मृतदेह वाहत आल्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती. मृतदेह यमुना नदीत वाहत आलेली माहिती गया पोलिसांना पण तात्काळ देण्यात आली होती.

पोलीस तात्काळ मृतदेहांचा तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. कानपुर आणि हमीरपूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाने लोक मृत होत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार यमुनेत अनेक मृतदेह वाहत येत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मृतदेह आणले जात आहेत आणि यमुना नदीत प्रवाहित केले जात आहेत. या ठिकाणी एखादी व्यक्ती मृत पावली तर तिचे मृतदेह अशाच प्रकारे नदीत सोडत असल्याचे पूर्वीपासून चालत आलेले आहे.

यमुनेत कोरोनाच्या आधी एक दोन मृतदेह वाहताना दिसत असत पण आता तेच प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उत्तर प्रदेश मधील ग्रामीण भागात किती मृत्यू होत आहेत हेच यावरून दिसून येत आहे. शेतात पण काही ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.