श्रीलंकेमध्ये सध्या अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ९ जुलै रोजी श्रीलंकेमधील(Sri Lanka) कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. कर्फ्यु असूनही मोठा जनसमुदाय यावेळी जमा झाला होता. यावेळी लोकांनी निदर्शने करत कोलंबोमधील राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले होते. तसेच अनेक सरकारी इमारती देखील लोकांनी ताब्यात घेतल्या होत्या.(Using social media, ‘these’ four youths overthrew the power of the Rajapaksa family in Sri Lanka)
यावेळी लाखोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. या आंदोलनामागे नेमकं कोण आहे? यासंदर्भातील माहिती आता समोर आली आहे. चार तरुणांनी मिळून या आंदोलनाची रणनिती आखल्याचे सांगितले जात आहे. या तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करत आंदोलनाची माहिती श्रीलंकेमधील लोकांपर्यंत पोहचवली असल्याचे सांगितले जात आहे.
यामधील पहिले नाव चामिरे देडवगे यांचे आहे. चामिरे देडवगे हे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहेत. ते नेहमीच श्रीलंकेमधील अनेक मुद्द्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवतात. चामिरे देडवगे हे एका जाहिरात कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. तसेच राजकीय विश्लेषक म्हणून देखील चामिरे देडवगे ओळखले जातात. एप्रिल महिन्यापासून चामिरे देडवगे या आंदोलनाची तयारी करत होते.
यामधील दुसरे नाव सत्या चरित अमरतुंगे यांचे आहे. सत्या चरित अमरतुंगे हे मोराटुआ येथील रहिवाशी आहेत. सत्या चरित अमरतुंगे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना श्रीलंकेमधील परिस्थिती समजावून सांगितली होती. सत्य चरित यांचा मार्केटिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ८० लाख लोकांना जोडले आहे.
तिसरे नाव रुवंती दी चिकेरा यांचे आहे. रुवंती दी चिकेरा या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तसेच त्या नाटककार देखील आहेत. रुवंती दी चिकेरा मागील काही महिन्यांपासून कोलंबोच्या आसपासच्या परिसरात स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. या माध्यमातून त्यांनी श्रीलंकेमधील परिस्थितीबाबत लोकांमध्ये जनजागृती केली आहे.
चौथे नाव अमिला जीवंत पेरीस यांचे आहे. अमिला जीवंत पेरीस हे कॅथलिक धर्मगुरू आहेत. अमिला जीवंत पेरीस यांनी श्रीलंकेमधील लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सर्व धार्मिक संघटनांना सरकाराच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच अमिला जीवंत पेरीस यांनी विद्यार्थ्यांची मदत घेत सरकारविरोधात आंदोलन देखील उभे केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पती रणबीर कपूरसोबत सोफ्यावर बसून आलिया भट्टने दाखवला बेबी बंप, समोर आला व्हिडीओ
मुंबई विद्यापीठात नामांतराच्या वादाचा भडका; राज्यपाल म्हणतात सावरकर तर विद्यार्थी शाहू महाराजांवर ठाम
डेटिंगच्या अफवांवर सुष्मिता सेनने सोडले मौन, सांगितले हार्ट ब्रेकचा सामना करण्याचे 5 उपाय