बॉडी स्प्रेचा वापर करत असाल तर, वेळेत सावध व्हा, नाहीतर…

अनेक लोकांना परफ्यूम, डियो, बॉडी स्प्रेची आवड असते. कुठे जाताना आपण आपल्या कपड्यांना बॉडी स्प्रे लावतो. काहींना बॉडी स्प्रेची एवढी आवड असती की, नवनवीन बॉडी स्प्रे दररोज वापरतात. मात्र, तुम्हाला कल्पनाही नसेल की, बॉडी स्प्रे लावणे आरोग्यासाठी किती घातक आहे ते जाणून घेऊयात.

बॉडी स्प्रेच्या अति वापरामुळे अंडर आर्म्स काळे पडतात. डियो थेट त्वचेवर वापरला तर यामुळे त्वचा काळपट होते. त्यामुळे परफ्युम किंवा डियो वापरताना काळजी घ्या. हे थेट त्वचेवर न लावता कपड्यांवर स्प्रे करा. दागिने घालण्यापूर्वी परफ्युम स्प्रे करून घ्या. अन्यथा यामुळे दागिन्यांच्या चमकण्यावर परिणाम होऊ शकतो.

बॉडी स्प्रे हे घामाचा वास कमी करण्यासाठी वापरतात. परंतु उलट यामुळे जास्त घाम येतो. घाम येण्याची प्रक्रिया वाढते. येणाऱ्या घामाला अधिक दुर्गंध येतो. बर्‍याच अभ्यासानुसार असे मानले जाते की शरीरातून घाम येणे फार महत्वाचे आहे. आणि डीओ लागू केल्यामुळे घाम येत नाही, ज्यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात.

डिओडोरंटचा रोज वापर केल्याने त्वचेवर लाल पुरळ उठते आणि खाज येण्यासारख्या समस्या होतात. बर्‍याच लोकांमध्ये परफ्युम किंवा डीईओसारख्या गोष्टींचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे कॉन्टॅक्ट डर्माटायटीस नावाचा एक आजार देखील होतो.

बॉडी स्प्रेच्या वापरामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या देखील होऊ शकतात. काही लोकांना तीव्र वास असलेल्या डिओडोरंटस पासून अ‍ॅलर्जी होते. बऱ्याच वेळा सुगंधित किंवा तीक्ष्ण सुवासमुळे लोकांना शिंका येणे, डोळ्यातून पाणी येणे किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या होतात ही अ‍ॅलर्जीची लक्षणे आहेत, जी तीव्र सुगंधामुळे होतात.

ताज्या बातम्या

कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, समोर आले त्यामागचे कारण; तज्ञांनी मोदींना दिला इशारा

इंडिअन आयडल १२ वर भडकले गायक अभिजित भट्टाचार्य, अनु मलिक यांनीही दिली साथ; अशा शब्दांत झापले..

लग्न सुरू असतानाच नवऱ्याचे खरे रूप आले समोर, पॅन कार्डवरील नाव बघून मांडवात राडा…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.