fighter jets : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच तीव्र होत चालला आहे. *पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे 1.40 वाजता पंजाबमधील भारतीय हवाई तळांवर हल्ला केला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून **भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या पाच प्रमुख लष्करी तळांवर अचूक हल्ले चढवले.*
पाकिस्तानकडून रुग्णालये आणि शाळांना लक्ष्य*
कर्नल *सोफिया कुरेशी, परराष्ट्र सचिव **विक्रम मिस्त्री* आणि वायूदलाच्या प्रवक्त्या *व्योमिका सिंग* यांनी आज घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, *पाकिस्तानने लाहोरहून नागरी विमानांच्या आडून भारतीय लष्करी रुग्णालये आणि शाळांनाही लक्ष्य केलं.* श्रीनगर, उधमपूर आणि अवंतीपूर येथील हवाई तळांवरही हल्ले झाले. या हल्ल्यांमुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले, तर काही कर्मचाऱ्यांना दुखापती झाल्या आहेत.
भारताचे प्रतिहल्ले: सियालकोट तळ उद्ध्वस्त*
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारताने संयम राखत सुरुवातीस बचावात्मक भूमिका घेतली होती. मात्र, पाकिस्तानकडून वारंवार फसव्या बातम्या आणि अपप्रचार केल्यानंतर भारताने निर्णायक पावलं उचलली. *भारतीय वायूदलाच्या फायटर जेट्सनी रफिकी, मुरीद, चकलाला, रहिम यार खान आणि सुकूर हवाई तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले चढवले.* यामध्ये *सियालकोटचा लष्करी तळ पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे*, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
नागरी हवाई मार्गांचा दुरुपयोग: पाकिस्तानचा कट?*
पाकिस्तानने *लाहोरमधून नागरी हवाई मार्गाचा दुरुपयोग करून* लष्करी कारवाया केल्याचा आरोप भारताने केला आहे. नागरी विमानांमागे लपून लढाऊ विमानं पाठवणं हा आंतरराष्ट्रीय युद्ध नियमांचा भंग असल्याचं भारताचं म्हणणं आहे. यामुळे लाहोर विमानतळावरील नागरी उड्डाणेही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.
26 ठिकाणी हवाई घुसखोरीचा प्रयत्न, सीमारेषेवर तणाव*
कर्नल कुरेशी यांच्या मते, पाकिस्तानने *26 ठिकाणी नियंत्रण रेषेवर हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला.* या सर्व घुसखोरीचे प्रयत्न भारताने वेळेवर निष्फळ ठरवले. तथापि, *उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर आणि भटिंडा* येथे काही प्रमाणात हानी झाल्याचं मान्य करण्यात आलं.
फेक न्यूज आणि दिशाभूल करणारे दावे*
कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानकडून भारताच्या तळांवर हल्ल्यांबाबत *दिशाभूल करणारे फेक व्हिडिओ आणि दावे प्रसारित केले जात असल्याचं सांगितलं.* भारताने हे सर्व दावे फेटाळून लावले असून *पाकच्या युद्ध नीतीला भारताच्या युद्ध यंत्रणेने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.*
भारताने संयम राखत ठोस कारवाई केली*
पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना भारताने संयमित पण ठाम उत्तर दिलं आहे. भारताच्या लष्करी वायुदलाने केवळ सर्जिकल स्ट्राइक नव्हे, तर *रणनैतिकदृष्ट्या अचूक आणि निर्णायक कारवाई करत पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना जबरदस्त धक्का दिला आहे.
using-a-false-route-to-conceal-the-movements-of-fighter-jets