‘पवित्र रिश्ता २’मध्ये दिसणार नाहीत उषा नाडकर्णी, कारण आले समोर

‘पवित्र रिश्ता’ मालिकेबद्दल आजही लोकांच्या मनात तितकच प्रेम आणि आपुलकी आहे. ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका ठरली होती. १ जून २००९ साली सुरु झालेली ही मालिका २०१४ पर्यंत लोकांच मनोरंजन करत होती.

I was numb for a moment,' says a shocked Usha Nadkarni on 'Pavitra Rishta'  co-actor Sushant Singh Rajput's sudden demise

‘पवित्र रिश्ता’ मालिकेत सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. तसेच या मालिकेत सविता प्रभुणे, प्रिया मराठे, उषा नाडकर्णी, किशोर महाबोले, प्रार्थना बेहरे हे कलाकार होते. आता या मालिकेचा सीक्वल म्हणजेच भाग २ येणार असल्याचे समजते.

‘पवित्र रिश्ता २ ‘ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे पाहायला मिळणार आहे. मानवच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरु आहे. मात्र या सीक्वल मध्ये सर्वांची आवडती उषा नाडकर्णी दिसणार नसल्याचे समजते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

पवित्र रिश्ता २ मध्ये उषा नाडकर्णी दिसणार नाहीत. त्यामागचे कारणही तसेच आहे. उषा नाडकर्णी यांनी आपल्या वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यामुळे सुरक्षितेसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी ही मालिका करत नसल्याचे सांगितले. त्यांचे वय लक्षात घेता आणि सध्याची परिस्थिती लक्ष्यात घेऊन त्या मालिकेत काम करणार नसल्याचे समजते.

उषा नाडकर्णी यांना डायबेटीस आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी ही मालिका करत नसल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांनी देखी त्यांना सध्याच्या परिस्थितीत काम न करण्यास सांगितले आहे.

उषा नाडकर्णी यांचा अभिनय सर्वांनाच खूप आवडतो. उषा नाडकर्णी या मराठी इंडस्ट्रीत खाष्ट सासूच्या भूमिकेमुळे चांगल्याच प्रसिद्ध झाल्या. तसेच त्यांनी बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. आजवर त्यांनी आपल्या अभिनयातून सर्वोतम भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Usha Nadkarni (Actress) Age, Husband, Children, Family, Biography & More »  StarsUnfolded

हिंदी सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयान वर्चस्व निर्माण केल. ‘पवित्र रिश्ता’मालिकेत त्यांनी सासूच्या भूमिकेचा दबदबा टिकवून ठेवताना दिसला. यावेळी मात्र त्यांना आपल्या सुरक्षितेसाठी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्या मालिकेत काम न करण्याचा त्यांचा निर्णय योग्यच आहे.

हे ही वाचा-

एकेकाळी यशाच्या शिखरावर असणारा आफताब शिवदसानीआजकाल कुठे गायब आहे; जाणून घ्या..

‘सिलसिला’ चित्रपटासाठी पहीली पसंत होत्या स्मिता पाटील आणि परवीन बाबी; पण अमिताभमूळे रातोरात सगळे बदलले

सलमाननंतर आता केआरकेने मिकासिंगशी घेतला पंगा; मिका सिंग म्हणाला, मी केस नाही करणार कानाखाली मारेन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.