उषा नाडकर्णी यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाल्या तो…

सुशांत सिंग राजपूत याने अभिनय क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली होती. तसेच आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. त्याने अभिनय क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिल.

सुशांतने छोट्या पडद्यापासून सुरु केलेला त्याचा प्रवास थोड्याच दिवसांत मोठ्या पडद्यापर्यंत पोहचला. तस्रच तो अल्पावधीतच सर्वांचा लाडका अभिनेता बनला. मात्र गेल्याच वर्षी १४ जूनला त्याने आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला.

सुशांतच निधन होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरीही त्याच्या मृत्यूच गूढ कायम आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या जवळच्या अनेक कलाकारांनी त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असूच शकत नाही कारण तो हार मानणारा नव्हता असे म्हटले आहे.

सुशांतच्या या टोकाच्या भूमिकेमुळे त्याच्या परिवारासह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना देखील आजही विश्वास बसत नाही. आजही त्याच्या जवळच्या व्यक्ती तसेच सहकलाकार अनेक पोस्ट करत आठवण काढत आहेत. तर त्याचा फोटो टाकून मिस यु कॅप्शन टाकत आहे.

याचदरम्यान जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. त्यामुळे त्याचा चांगलाच परिचय झाला होता. तसेच एकमेकांबद्दल माहितीही होती.

I was numb for a moment,' says a shocked Usha Nadkarni on 'Pavitra Rishta'  co-actor Sushant Singh Rajput's sudden demise

उषा नाडकर्णी सांगतात, पवित्र रिश्ता मालिकेच्या वेळी सुशांत अवघ्या २३-२४ वयाचा होता. तो अतिशय हसमुख होता. सेटवर सगळ्यांशी मिळून-मिसळून राहायचा.  नेहमी मला बोलायचा, ताई मुंबईत घर घेण्याच स्वप्न आहे. मुंबईत घर घेण्यासाठी खूप पैसे लागतात असे मी त्याला सांगायची.

यावर सुशांत नेहमी म्हणायचा ‘ताई कुछ तो करेंगे प्र अपना घर होगा’. पुढे त्याला इंडस्ट्रीत  काय करायचे होते हे सगळ प्लानिंग होते. आणि त्याने तस करूनही दाखवले. आपल्या कष्टाच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य केल्या.

सुशांत एक उत्तम कलाकार होता. असा शहाणा मुलगा कस काय आत्महत्या करू शकतो? त्याने आत्महत्या केली यावर उषा नाडकर्णी यांना विश्वास बसत नाही. आजही माझ मन मला सांगताय त्याची हत्याच झाली असणार. गेल्या वर्षापासून त्याच्या आत्महत्येवर शोध सुरु आहे पण अजून कसे काही हाती लागल नाही.

उषा नाडकर्णी यांना सुशांत गेल्याची बातमी हेअर ड्रेसरने संगीतली. ही बातमी ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांना आजही सुशांत आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. त्या म्हणतात सत्य लवकरात लवकर समोर याव हीच इच्छा आहे.

हे ही वाचा-

फेसबुकवर मैत्री झालेल्या मैत्रिणीला घरी कोणी नसताना बोलावले, नंतर घडला हा धक्कादायक प्रकार

सावधान! रोज परफ्युम वापरत असाल तर शरीरावर होतील हे गंभीर परिणाम, जाणून घ्या

धक्कादायक! हाडे गोठणाऱ्या थंडीत झाली १०० किमी मॅरेथॉन; थंडीमुळे २१ स्पर्धकांचा मृत्यु

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.