‘मंजूर झालेल्या निधीचा वेळेत आणि पूर्णपणे वापर करा; अजित पवारांच्या सूचना’

 

बारामती | चालू आर्थिक वर्षात ज्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे, त्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वेळेत पूर्णपणे वापर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अजित पवार यांनी काल (शनिवार) बारामती येथील विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.

सध्या विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी बारामतीच्या हवामानात टिकून राहणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करावी.

तसेच आसपासचा परिसर सुशोभित करावा. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना प्रसन्न वाटावे, असे वातावरण हवे, अशा सूचनाही अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.