सावधान! रोज परफ्युम वापरत असाल तर शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, जाणून घ्या

कुठे बाहेर जाताना आपण आपल्या कपड्यांना बॉडी स्प्रे लावतो. अनेक लोकांना परफ्यूम, डियो, बॉडी स्प्रेची आवड असते. काही लोक नवनवीन बॉडी स्प्रे दररोज वापरतात. पण तुम्हाला कल्पनाही नसेल की, बॉडी स्प्रे लावणे आरोग्यासाठी किती घातक असते.

बॉडी स्प्रेच्या अति वापरामुळे अंडर आर्म्स काळे पडतात. डियो थेट त्वचेवर वापरला तर यामुळे त्वचा काळपट होते. त्यामुळे परफ्युम किंवा डियो वापरताना काळजी घ्या. हे थेट त्वचेवर न लावता कपड्यांवर स्प्रे करा. दागिने घालण्यापूर्वी परफ्युम स्प्रे करून घ्या. अन्यथा यामुळे दागिन्यांच्या चमकण्यावर परिणाम होऊ शकतो.

बॉडी स्प्रे हे घामाचा वास कमी करण्यासाठी वापरतात. परंतु उलट यामुळे जास्त घाम येतो. घाम येण्याची प्रक्रिया वाढते. येणाऱ्या घामाला अधिक दुर्गंध येतो. बर्‍याच अभ्यासानुसार असे मानले जाते की शरीरातून घाम येणे फार महत्वाचे आहे. आणि डीओ लागू केल्यामुळे घाम येत नाही, ज्यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात.

डिओडोरंटचा रोज वापर केल्याने त्वचेवर लाल पुरळ उठते आणि खाज येण्यासारख्या समस्या होतात. बर्‍याच लोकांमध्ये परफ्युम किंवा डीईओसारख्या गोष्टींचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे कॉन्टॅक्ट डर्माटायटीस नावाचा एक आजार देखील होतो.

बॉडी स्प्रेच्या वापरामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या देखील होऊ शकतात. काही लोकांना तीव्र वास असलेल्या डिओडोरंटस पासून अ‍ॅलर्जी होते. बऱ्याच वेळा सुगंधित किंवा तीक्ष्ण सुवासमुळे लोकांना शिंका येणे, डोळ्यातून पाणी येणे किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या होतात ही अ‍ॅलर्जीची लक्षणे आहेत, जी तीव्र सुगंधामुळे होतात.

ताज्या बातम्या

लग्न सुरू असतानाच नवऱ्याचे खरे रूप आले समोर, पॅन कार्डवरील नाव बघून मांडवात राडा…

भिकारी बनणे संजीव कुमारला पडले महागात; दिग्दर्शकाने न ओळखताच सेटवरुन पळवून लावले

रोज करा ‘हा’ घरघुती सोप्पा उपाय; गुप्तरोग बरा होतो आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.