अगं बाबोव! बाॅलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने घातलाय तब्बल ३७ करोडचा ड्रेस; कारण वाचा..

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या अभिनयाने बरीच मने जिंकली आहेत. उत्कृष्ट अभिनेत्री होण्याव्यतिरिक्त ती फॅशन आयकॉन देखील आहे. अलीकडेच, अभिनेत्री अरब फॅशन वीकमध्ये शोस्टॉप बनणारी पहिली भारतीय महिला ठरली. अरब फॅशन वीकमध्ये तिचा शोस्टॉप बनणे संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. आता उर्वशीने एका चित्रपटासाठी सोन्याचा ड्रेस परिधान केला आहे.

अरब फॅशन वीक दरम्यान उर्वशी रौतेलाचा एक लघुपटही रिलीज झाला ज्यामध्ये तिने ‘क्वीन ऑफ इजिप्त क्लिओपेट्रा’ ची भूमिका साकारली. इजिप्तच्या राणीच्या भूमिकेत ती खूपच सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्याने असा पोशाख परिधान केला होता, ज्याची किंमत ऐकून तुम्ही चकित व्हाल.

उर्वशी रौतेला शॉर्ट फिल्ममध्ये ‘डिझायनर फर्न आमाटो’ या चित्रपटात दिसली होती, यात ती ‘क्वीन ऑफ इजिप्त क्लिओपेट्रा’ च्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटासाठी तिने ५ दशलक्ष डॉलर्सचा म्हणजे भारतीय किंमतीत तब्बल ३७ करोड रूपयांचा ड्रेस परिधान केला होता.

उर्वशी रौतेला तिच्या स्टाईल आणि तिच्या कपड्यांविषयी चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अभिनेत्री नेहा कक्करच्या लग्नात तिने आपल्या लुकने सर्वांना घायाळ केले होते. नेहा कक्करच्या लग्नात उर्वशी रौतेलाने ५५ लाखाचा लेहेंगा घातला होता.

त्याचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत; गोविंदाने केली करण जोहरची पोलखोल

…म्हणून मीनाक्षी शेषाद्रीने लग्नानंतर बॉलीवूड सोडले

चहा पिताना ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.