Share

रशियाच्या अणुयुद्धाच्या धमकीमुळे युरोपात दहशत, नागरिकांनी ‘या’ गोळ्या विकत घेण्यासाठी केली गर्दी

urope-people.

गेल्या आठ दिवसांपासून रशिया(Russia) आणि युक्रेन(Ukren) यांच्यात युद्ध सुरु आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाचेराष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimaar Putine) यांनी आण्विक प्रतिबंधक टीमला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे युक्रेनवर आण्विक हल्ल्याची शक्यता निर्माण झाली आहे.(uropean people buy iodine pills)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलेल्या आदेशामुळे युरोपमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळलेल्या माहितीनुसार, पुतीन यांनी दिलेल्या आदेशामुळे मध्य युरोपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच वेळी, पोलंडपासून बेलारूस आणि माजी सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तयार झालेल्या स्वतंत्र देशांपर्यंत ही लढाई होण्याची भीती आहे.

युरोपमधील लोक अणुहल्ल्याच्या भीतीने आयोडीनच्या गोळ्या विकत घेत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की, जर अणुहल्ला झाला तर हे आयोडीन त्यांना किरणोत्सर्गापासून वाचवेल. त्यामुळेच युरोपमध्ये आयोडीनच्या गोळ्यांची मागणी फार वाढली आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये सध्या आयोडीनच्या गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आयोडीनच्या गोळ्यांचा तुटवड्याबाबत युरोपमधील फार्मसी युनियनचे अध्यक्ष निकोले कोस्तोव यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “गेल्या सहा दिवसांत बल्गेरियाच्या फार्मसीने इतक्या आयोडीनच्या गोळ्या विकल्या आहेत, जितक्या त्यांनी एका वर्षात देखील विकल्या नव्हत्या. अनेक फार्मसीत आयोडीनच्या गोळ्या आधीच संपलेल्या आहेत”, अशी माहिती निकोले कोस्तोव यांनी दिली.

“आयोडीनच्या गोळ्यांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आम्ही नवीन मालाची ऑर्डर दिली आहे. पण मला भीती वाटते की तो साठाही लवकरच संपेल. यूरोपमधील लोक आयोडीनच्या गोळ्यांचा साठा करत आहेत”, असे युरोपमधील फार्मसी युनियनचे अध्यक्ष निकोले कोस्तोव यांनी सांगितले. यूरोपमधील झेक प्रजासत्ताक या देशातील लोक आयोडीनच्या गोळ्यांसाठी एकमेकांशी भांडत आहेत.

झेक प्रजासत्ताक देशातील डॉ मॅक्स फार्मसीचे प्रतिनिधी मिरोस्लावा स्टॅनकोवा यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मिरोस्लावा स्टॅनकोवा म्हणाले की, “झेक प्रजासत्ताक देशातील लोक आयोडीनच्या गोळ्या विकत घेण्यासाठी वेडे होत आहेत. हे चित्र पहिल्यांदाच दिसत आहे. त्यामुळे सध्या आयोडीनच्या गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. किरणोत्सर्गाच्या धोक्यात, थायरॉईड आणि कर्करोगासारख्या रोगांपासून मानवी शरीराचे संरक्षण करण्यासाठी आयोडीन फार महत्वाचे असते.

महत्वाच्या बातम्या :-
युक्रेन सोडताना भारतीय विद्यार्थ्यांना मरणयातना, सैनिकांनी केला लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा
विधिमंडळात खाली डोकं वर पाय करणारे आमदार संजय दौंड कोण आहेत? शरद पवारांच्या एका शब्दावर झालते विजयी
‘मी लोकांना सांगू शकत नाही की कोणत्या परिस्थितीतून जातोय’, विराटचे खळबळजनक वक्तव्य

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now