कंगनाच्या टिकेला उर्मिला मातोंडकरचे प्रत्युत्तर; म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू आहे. कारण उर्मिला मातोंडकर यांनी कंगना विरोधात काही गोष्टी बोलून दाखवल्या होत्या. त्या गोष्टींना प्रत्युत्तर देताना कंगनाची जीभ घसरली होती.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने उर्मिला यांचा उल्लेख सॉफ्ट पॉर्न स्टार असा केला होता. यानंतर छञपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी कंगणाला प्रत्युत्तर दिले आहे. प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है, संयमही प्रतिशोध को काबू पाने का उपाय होता होता है.

शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत हा मेसेज लिहिला आहे. आणि त्यात असंही लिहिले आहे की, शिवाजी महाराज अमर रहे. असं म्हणत उर्मिलाने कंगणाला संयमीपणे उत्तर दिले आहे. हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांची एक माझ्या विरोधातली मुलाखत पाहिली. ज्याप्रकारे त्या माझ्याबद्दल बोलत आहेत, ते पूर्ण डिवचण्यासारखं आहे. उर्मिला यांनी माझ्या संघर्षाची खिल्ली उडवली आहे.

मला भाजपाकडून तिकिट हवं आहे असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळे त्या माझ्यावर शाब्दिक हल्ला करत आहेत. मात्र उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत, असं कंगना उर्मिला मातोंडकरच्या विरोधात बोलली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.