ही गोष्ट आहे एका खुप वेगळ्या अभिनेत्रीची. जिने लहानपणीच सिद्ध केले होते की, ती पुढे जाऊन खुप मोठी अभिनेत्री होणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे ऊर्मिला मातोंडकर. ४ फेब्रुवारी १९७४ मध्ये ऊर्मिला मातोंडकरचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला.
ऊर्मिलाच्या घरातील आर्थिक परिस्थिती खुप वाईट होती. म्हणून ऊर्मिलाचे बालपण खुप छोट्या घरात गेले होते. तिचे कुटुंब चाळीत राहत होते. ऊर्मिलाला लहानपणापासूनच अभिनयाची खुप जास्त आवड होती. म्हणून तिने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली.
अनेक मराठी चित्रपटांमध्ये ऊर्मिलाने बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ती ‘कलयुग’ चित्रपटामध्ये एका मुलाची भुमिका करताना दिसली. त्यानंतर १९८३ मध्ये ती शेखर कपूरच्या ‘मासूम’ चित्रपटामध्ये दिसली.
या चित्रपटात तिने शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शाह अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. या चित्रपटातील भुमिकेसाठी ऊर्मिलाचे खुप जास्त कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर ऊर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून ‘चाणक्यम’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
‘नरसिंम्हा’ चित्रपटातून ऊर्मिलाने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले होते. त्यानंतर तिने चमत्कार, आ गले लग जा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ऊर्मिलाला बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली होती. पण ते यश मिळत नव्हते.
ज्याची ती वाट बघत होती. ऊर्मिलाने कधीही हार मानली नाही. ती बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी संघर्ष करत होती. याच कालावधीमध्ये ऊर्मिलाची भेट राम गोपाल वर्मासोबत झाली. त्यांनी ऊर्मिलाला ‘रंगीला’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली.
या चित्रपटात अगोदरपासूनच जॅकी श्रॉफ आणि आमिर खान सारखे सुपेरस्टार्स काम करत होते. या चित्रपटात ऊर्मिलाने अतिशय उत्तम पद्धतीने अभिनय केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आणि ऊर्मिला रातोरात बॉलीवूडची स्टार झाली होती.
त्यानंतर ऊर्मिलाने राम गोपाल वर्मासोबत कौन, सत्या, प्यार तुने क्या किया अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ऊर्मिलाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. खुबसुरत, जुदाई, दौड, जंगल यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ऊर्मिलाने काम केले आणि प्रसिद्धी मिळवली.
‘पिंजर’ हा ऊर्मिला मातोंडकरच्या करिअरमधला सर्वात उत्तम चित्रपट होता. या चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख निर्माण करून दिली होती. पण हळूहळू ऊर्मिला चित्रपटांपासून लांब जात होती. पण तरीही तिची प्रसिद्धी मात्र कमी झाली नव्हती.
ऊर्मिलाने अनेक वर्षे टेलिव्हिजनवर देखील काम केले. करिअरच्या सुरुवातीला अनेक अभिनेत्यांसोबत ऊर्मिलाचे नाव जोडले गेले होते. पण २०१६ मध्ये ऊर्मिलाने बिजनेस मॅन मोहसीन अख्खतर निरसोबत लग्न केले. लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रापासून पुर्णपणे लांब गेली.
ऊर्मिलाने २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला. तिने मल्याळम, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. आज ऊर्मिला अभिनय क्षेत्रापासून लांब आयुष्य जगत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जाणून घ्या सध्या नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झालेली रश्मीका मंदाना नक्की कोण आहे?
‘या’ पाच महागड्या गोष्टींची मालकीन आहे ऐश्वर्या राय बच्चन
संजय दत्तच्या गर्लफ्रेंडला किस केल्यामुळे धर्मेंद्रने खाल्ला होता संजू बाबाचा मार