उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही तर सॉफ्ट पॉर्नसाठी प्रसिद्ध; कंगनाची जीभ घसरली

मुंबई । कंगना रणावत गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांवर टीका करत आहे. आता कंगणाने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणा बोलत होती.

माझ्या संघर्षांची थट्टा करणे आणि मी तिकीटासाठी भाजपला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे. खरेतर मला तिकीट मिळणे फारसे कठीण नाही. उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे.

पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते?, सॉफ्ट पॉर्नसाठी ना? असे कंगणाने म्हटले आहे.

उर्मिला मातोंडकरने कंगणाला देण्यात आलेल्या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेवरून आणि मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून कंगणाला फटकारले होते. कंगणा राणावत तिच्यावर टीका करणाऱ्या प्रत्येकाला प्रतिक्रिया देत आहे.

अशातच तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे. मात्र आता यावरून जोरदार वातावरणात तापणार आहे. कंगणाने फार खालच्या भाषेत उत्तर दिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.