गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाल्यानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. रविवारीच लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या शिवाजी पार्क येथील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परंतु त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमानंतर सोशल मीडियासोबत राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेने उधाण घेतले आहे.(urmila matondkar angry on trollers )
लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक राजकिय नेत्यांनी आणि बॉलिवूड कलाकारांनी आपली उपस्थिती दाखवली होती. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा देखील समावेश होता. यावेळी लता मंगेशकर यांचे अंतिम दर्शन घेत असताना शाहरूख खानने देखील श्रद्धांजली वाहिली. परंतु श्रद्धांजली वाहत असताना शाहरूख खान लता मंगेशकर यांच्यावर थुंकला या चर्चेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
सोशल मीडियावर देखील अनेकांनी शाहरूख खानवर टीका करण्यात सुरूवात केली. यामध्ये राजकिय नेत्यांनी देखील हस्तक्षेप घेत शाहरूखवर टीका करण्यात सुरूवात केली. त्यामुळे यावर संतप्त होऊन मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आपली प्रतिक्रिया ट्विटद्वारे नोंदवली आहे.
उर्मिला मातोंडकरने ट्विट करत म्हंटले आहे की, “याला थुंकणे नाही, फुंकणे म्हणतात. या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात. पंतप्रधानांचा फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे होते. भारत मातेच्या मुलीचे गाणे ऐका ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान.’ आजचा दिवस तरी सोडायचा होता.”
थूकना नही दुआओं को फुँकना कहते हैं।इस सभ्यता,संस्कृति को #भारत कहते हैं।
प्रधानमंत्री जी की फ़ोटो तो लगा रखी हैं, उनसे कुछ सीखा होता।
भारत माँ कीं अनमोल बेटी का गाना सुनें
“ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान,
सारा जग तेरी सन्तान”
(आज का दिन तो छोड़ देतें🙏🏻) https://t.co/fjmUWor9Fh pic.twitter.com/c6tkhiEK1d— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) February 6, 2022
या ट्विटसोबत उर्मिलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ते दरगातमध्ये हात जोडून येत असताना दिसत आहे. उर्मिलाने केलेल्या ट्विटवर काँग्रेस नेते अरुण यादव यांनी प्रतिउत्तर केले आहे. त्यांनी शाहरूख खानचा लता मंगेशकरांना आदरांजली वाहतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच “याने थुंकले आहे का”, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
सध्या उर्मिला मातोंडकरने केलेल्या ट्विटनंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसऱ्या बाजूला शाहरूख खानने जी काही कृती केली, त्या कृतीला मुस्लीम धर्मात दुवा देणे आणि त्यानंतर फुंकर मारणे असे म्हणले जाते, हे स्पष्टीकरण अनेकजण देताना दिसत आहेत. यावर अभिनेता शाहरुख खानकडून काय उत्तर येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
लता मंगेशकर यांना कोणी दिले होते स्लो पॉयजन? त्यांनी ५० वेळा एकच चित्रपट का पाहिला? वाचा किस्से
लता मंगेशकरांच्या आठवणींमध्ये हरवून गेल्या आशा भोसले, शेअर केला अनमोल फोटो
नाद खुळा! ६ लाख खर्चून शेतकऱ्याने घरावर बसवला खराखुरा ट्रॅक्टर; ‘हे’ आहे कारण…