सध्या आपल्या देशाबरोबरच देशातील अनेक नागरिक हे आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली आहे. तसेच अनेकांचे उद्योग देखील बंद पडले आहेत. यामुळे यासाठी पुन्हा पैसे कसे उभा करायचे हा विचार अनेकजण करत आहेत.
आता मात्र आपल्याकडील काही वस्तूंवर आपल्याला लगेच पैसे मिळू शकतात. आणि आपल्याकडे पैसे आली की आपण पुन्हा त्या वस्तू देखील आपल्या ताब्यात घेऊ शकतो. तसेच बँकेतील काही कार्डद्वारे देखील आपल्याला पैसे मिळतात. ही गोष्ट अनेकांना माहिती नसते.
आपण क्रेडिट कार्डवर देखील कर्ज घेऊ शकतो. जर तुमच्या क्रेडिट कार्डची हिस्ट्री चांगली असेल. जर क्रेडिट कार्ड बिलांचे बिल वेळेवर दिले गेले असेल तर आपणास क्रेडिट लिमिटच्या आधारे त्वरित कर्ज मिळू शकेल. जास्त काही गोष्टी न लागता यासाठी बँकेत काही कागदपत्रे दिली की हे कर्ज मिळते.
तसेच पीपीएफवर कर्ज देखील आपल्याला मिळू शकते. पीपीएफ खाते तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे कर्ज उपलब्ध आहे आणि पीपीएफ खाते उघडल्यानंतर सहा वर्षांच्या कालावधीसाठी ते उपलब्ध आहे. कर्जाची रक्कम आपल्या पीपीएफ खात्यात किती पैसे जमा आहे यावर अवलंबून असेल. ठेवीच्या जास्तीत जास्त 25 टक्के कर्जे मिळू शकतात. यामुळे येथून देखील आपल्याला पैसे मिळू शकतात.
तसेच आपल्याकडे घरात सोने असते. यावर देखील आपण कर्ज मिळवू शकता. मध्यवर्ती बँक आरबीआयने यंदाच्या ऑगस्टमध्ये सर्वांना मोठा दिलासा दिला, ज्यामुळे तुमच्याकडील सोन्याचे दागिने किंवा सोन्याच्या नाण्याच्या किंमतीच्या 90 टक्के इतके कर्ज घेतले जाऊ शकते. यामुळे यावर देखील आपण पैसे उपलब्ध करू शकतो.
तसेच आपक्याकडे मोठे चारचाकी वाहन असले तरी आपण त्या वाहनावर कर्ज घेऊ शकतो. योग्य ती कागदपत्रे देऊन आपण हा पैसा उभा करू शकतो. सध्या या गोष्टी अनेकांना माहीत नसतात. यामुळे अनेकांना पैसे मिळवण्यासाठी मोठी अडचण देखील निर्माण होते.