Share

VIDEO: शर्टाचे बटन खोलून उर्फी जावेदने केला डान्स, युजर्स म्हणाले, ‘काहीतरी नवीन करत जा’

‘बिग बॉस’ मधून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री उर्फी जावेद अनेकदा तिच्या अनोख्या स्टाइलमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्री उर्फी जावेदने(Urfi Javed) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.(urfi javed new dance video viral)

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्फी जावेदने जांभळ्या रंगाचा शर्ट आणि पॅंट परिधान केलेली दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने तिच्या शर्टची बटणे उघडली आहेत. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद वेगळ्या स्टाईलमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्री उर्फी जावेद रणवीर सिंगची खप मोठी फॅन आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद अभिनेता रणवीर सिंगच्या एका गाण्यावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना अभिनेत्री उर्फी जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले की, “त्याच्यासारखा डान्स कधीच करता येत नाही. पण मी त्याच्यावर प्रेम करते. @ranveersingh मी तुझ्यावर प्रेम करते आणि या गाण्यावर नाचणे मी थांबवू शकत नाही.”

https://www.instagram.com/reel/CdIuAlTlWqP/?utm_source=ig_embed&ig_rid=bc2f6b9e-46ad-4798-8099-045674f6582f

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट देखील केल्या आहेत. तर काही जणांनी या व्हिडिओवरून अभिनेत्री उर्फी जावेदला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.

एका युजरने कमेंट करत म्हंटले की, “आता काहीतरी वेगळं करा.. तुम्ही नेहमी तेच-तेच का करता.” अभिनेत्री उर्फी जावेद बिग बॉस ओटीटी या रिऍलिटी शो ची स्पर्धक होती. अनेकदा सोशल मीडियावर अभिनेत्री उर्फी जावेदला ट्रोल करण्यात येते. तिच्या अनोख्या स्टाईलची युजर्स सोशल मीडियावर खिल्ली उडवतात. पण उर्फीला त्याचा फारसा फरक पडत नाही.

अभिनेत्री उर्फी जावेद सध्या सोशल मीडिया सेलिब्रिटी झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्री उर्फी जावेदचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नुकताच अभिनेत्री उर्फी जावेदने साडीमधील एक व्हिडिओ शेअर केला होता. चाहत्यांना हा व्हिडिओ फार आवडला होता.

महत्वाच्या बातम्या :-
नोराच्या स्टाईलने वाढवले स्टेजचे तापमान, शेजारी उभ्या असलेल्या रणवीरलाही फुटला घाम
VIDEO: गरीब मुलांनी ‘या’ अभिनेत्याला प्रेमाने मारली मिठी, अभिनेत्याची प्रतिक्रिया पाहून चाहते झाले भावूक
13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्यानंतर संतापला रितेश देशमुख, म्हणाला, रक्षकच भक्षक झाले तर…

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now