र्फी जावेद सतत तिच्या कपड्यांमुळे प्रसिद्धी झोतात असते. तिच्या कपड्यांमुळे तिच्यावर टीका देखील होत असतात. सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जाते तर काही नेटकरी तिच्या कपड्यांच्या फॅशन सेन्सचे कौतुकही करता. अशातच तिने जावेद अख्तरांची भेट घेतली. या भेटीचा फोटो उर्फी जावेदने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे, ‘अखेर माझ्या आजोबांना भेटले’ या फोटोला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उर्फी जावेद ही एका फॅशन शो साठी दिल्लीला गेली असता ही भेट घडली. या भेटीदरम्यान हा फोटो काढण्यात आला. हा फोटो शेअर करत तिने अखेर आजोबा भेटले असे म्हणत ते खूप दिग्गज आहेत. त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी अनेक लोकं उत्सुक होते. त्यांनी सगळ्यांसोबत फोटो काढला. त्यांनी खूप गप्पा केल्या. ते खुप छान आहेत आणि या भेटीमुळे मी आनंदी आहे.
उर्फी सध्या अनेक वादांत अडकली आहे. नुकताच तिचा आणि चित्रा वाघ यांचा ट्विटरवर ट्विट च्या माध्यमातून शाब्दिक वाद सुरू होता. तिच्या बोल्ड लूकमुळे तिच्यावर टीका होतच असते. परंतु चित्रा वाघ यांच्या ट्विट ला जसेच्या तसे उत्तर उर्फीने दिले होते. हा वाद बराच चर्चेत होता.
उर्फी जावेदला बिग बॉस ओटीटीमुळे जास्त फेम मिळाले. बिगबॉस ओटीटीच्या पहिल्याच सिझन मध्ये ती घराघरात पोहचली. तिच्या चाहत्यांमध्ये तरुण मंडळीची संख्या जास्त आहे.तिचे इन्स्टाग्रामवर लाखोंच्या संख्येवर चाहते आहेत.
उर्फी जावेद हे नाव चर्चेत असते ते तिच्या कपड्यांमुळे. उर्फी जावेद आणि तिचे कपडे हे गणित सगळ्यांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या फॅशनचे कपडयांमुळे उर्फी जावेद ट्रोलर्सच्या सतत निशाण्यावर असते.
महत्वाच्या बातम्या
पुन्हा विचित्र ड्रेसमुळे ट्रोल झाली उर्फी जावेद, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘न्युड शुट आहे का?’
BJP : भाजपमध्ये महीला सेफ नाहीत म्हणत महीला नेत्याने दिला राजीनामा; उर्फी चित्रा वाघांना डिवचत म्हणाली आता..
surpriya sule : उर्फी जावेद प्रकरणात आता सुप्रिया सुळेंची उडी; फडणवीसांना म्हणाल्या, देवेंद्रजी…