अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिच्या बोल्ड कपड्यांमुळे देखील चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. पण या ट्रोलिंगमुळे अभिनेत्री उर्फी जावेदला काहीही बदल घडत नाही. आता पुन्हा एकदा अभिनेत्री उर्फी जावेदने(Urfi Javed) बोल्ड वक्तव्य केलं आहे.(Urfi Javed got angry at the journalist’s question)
या बोल्ड वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्री उर्फी जावेदला पत्रकारांनी तिच्या फॅशनबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अभिनेत्री उर्फी जावेद म्हणाली की, “एक दिवस मी कपडेच घालणार नाही. काय सरप्राइज आहे यार. माझे सगळे आउटफिट्सच सरप्राइज असतात. प्रेक्षकांना चकित करावं असं माझ्या मनात नाही. मला जे आवडते ते मी घालते”, असे अभिनेत्री उर्फी जावेदने सांगितले.
अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्फी जावेदने एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्फी जावेदने अभिनेता रणवीर सिंगच्या एका गाण्यावर डान्स केला होता.
हा व्हिडिओ शेअर करत असताना अभिनेत्री उर्फी जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले की, “त्याच्यासारखा डान्स कधीच करता येत नाही. पण मी त्याच्यावर प्रेम करते. @ranveersingh मी तुझ्यावर प्रेम करते आणि या गाण्यावर नाचणे मी थांबवू शकत नाही.” अभिनेत्री उर्फी जावेदच्या या व्हिडिओला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्फी जावेदने आर्यन खान आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांच्यासंदर्भात एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती. या इंस्टा स्टोरीमध्ये उर्फीने लिहिले होते की, “आर्यन खान माझ्या वयाचा आहे, पण मला त्याच्या वडिलांवर क्रश आहे.” या इन्स्टा स्टोरीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.
अभिनेत्री उर्फी जावेदचा एक व्हिडिओ मध्यंतरी प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्फी जावेदने स्वतः ला मराठी येत नसल्याचे सांगितले होते. त्यावर पत्रकाराने तिला म्हटलं होत की, “महाराष्ट्रात राहत आहेस म्हंटल्यावर मराठी तर यायला हवी. मराठी शिकून घ्या.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
महत्वाच्या बातम्या :-
इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये व्यक्त केली इच्छा, म्हणाला, मला दिपीकासोबत…
मला दिपीकासोबत ‘तसे’ सीन्स करायचेत, इमरान हाश्मीच्या वक्तव्याने सगळेच हैराण
उद्धव ठाकरेंचे ‘ते’ वक्तव्य झोंबले! ३० वर्षे साथ देणाऱ्या नेत्याने शिवसेना सोडून मनसेत केला प्रवेश