Entertainment: प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या कपड्यांवरून राज्यात वाद सुरू आहे. ती आता कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh)यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे.
उर्फी आणि चित्रा वाघ सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास दररोज एकमेकींना टार्गेट करताना दिसतात. अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. त्याचवेळी, मुंबई पोलिसांनी उर्फी विरोधात नोटीस जारी केली आहे, ज्यामुळे उर्फीच्या अडचणी वाढू शकते.
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. मात्र आता आंबोली पोलिसांनी उर्फीला नोटीस पाठवली आहे.
या नोटीसमध्ये त्यांनी उर्फी जावेदला १४ जानेवारीला आंबोली पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या नोटीसची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
आता उर्फीला अटक होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड आणि विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. या हॉट आणि बोल्ड कपड्यांमुळे उर्फी अडचणीत आली आहे. त्यामुळे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा यांनी केली आहे.
दरम्यान, चित्रा वाघ उर्फीच्या विरोधात रस्त्यावरही उतरल्या होत्या. जिथे उर्फी दिसेल तिथेच तिच्या कानशिलात मारेल असेही चित्रा वाघांनी म्हटले होते. आता हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उर्फी जावेदसारख्याच एका मॉडेलचा चित्रा वाघ यांच्याकडून सत्कार, सोशल मिडीयावर फोटो व्हायरल
- शिर्डीला जाण्यासाठी पत्नीने केला हट्ट, त्याने सुट्टीही घेतली, पण काळाने घातला घाला अन् अख्ख कुटुंबच संपल
- सयाजी शिंदेंचं १ तासाचं मानधन बघून आईची होती ‘अशी’ प्रतिक्रिया, वाचून डोळ्यात पाणी येईल