महागठबंधनची मुसंडी, बहुमताचा आकडा गाठला, १२६ जागांवर आघाडी

मुंबई | बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. हाती येत असलेल्या कलांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वात महागठबंधनने बहुमताचा आकडा पार केला आहे. महागठबंधन १२६ जागांवर आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे एनडीए १११ जागांवर आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांच्या JDU आणि भाजपच्या महायुतीनं शंभरी पार केली आहे. NDAला आतापर्यंत १११ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान या निवडणुकीत नितीश कुमार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारण नितीश यांचा JDU पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्यता आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. तर तेजस्वी यादव यांच्या RJD ला बिहारच्या जनतेनं डोक्यावर घेतल्याचं आतापर्यंतच्या कलानुसार पाहायला मिळत आहे.

RJDचे नेते तेजस्वी यादव यांना विजयाचा विश्वास आहे. दरम्यान, एक्झिट पोलच्या अदांजानुसार महाआघाडीची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहारचे आणि भारतातील एखाद्या राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत.

तमाम मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दिलेले झुकते माप आणि तरुणांमध्ये तेजस्वी यांच्याविषयी असलेले आकर्षण या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यांना पसंती दिली जाते की, मतदार नितीशकुमार यांना चौथ्यांदा संधी देतात, याचा फैसला आज होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

राज्यपालांनी फोन केला अर्णबला नातेवाईकांना भेटूद्या; गृहमंत्र्यांनी थेट सुनावले नाही जमणार
या लढाईत मराठी माणसांनी आमच्या मागे उभं राहावं; अक्षता नाईक यांचं भावनिक आवाहन
तेजस्वी यादव आज जर जिंकले तर संपूर्ण देशात इतिहास रचतील; तो कसा? वाचा…..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.