नव्या नवरीने अर्ध्या रात्री बॉयफ्रेंडला बोलावले घरी अन् पुढे जे घडलं ते धक्कादायकच होतं…

गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशमध्ये अनेक धक्कादायक घटना घडत आहे. त्यामध्ये लग्नामध्ये फसवाफसवीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत चालले आहे. आता अशीच एक पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमध्ये तुर्कमानपुरमध्ये एक लग्न झाले होते. पण लग्नाला पुर्ण एक महिना पण झाला नाही आणि नवरी तिच्या प्रियकरासोबत फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नव्या नवरीने प्रियकराला बोलवून १५ लाखांचे सामान घेऊन फरार झाली आहे.

नवरी पळाली तेव्हा ही सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. नातेवाईकांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. तसेच राजघाटच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मनीष कुशवाहा नावाच्या तरुणाचे २७ एप्रिलला एका तरुणीसोबत लग्न झाले होते. लग्न लॉकडाऊनचे नियम पाळत झाले होते. त्यानंतर नवरी मुलीची विदाई पण झाली होती. त्यानंतर २९ एप्रिलला एक भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यानंतर मुलगी आपल्या माहेरी गेली होती, चार दिवसांपुर्वीच ती पुन्हा आपल्या सासरी आली होती.

अशात २७ मेला रात्री या तरुणीने आपल्या प्रियकराला बोलावून सासरच्या घरुन काही दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. सकाळी जेव्हा तिच्या पतीने पाहिले तेव्हा तरुणी गायब होती, त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला.

त्यानंतर त्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तपास केला असता, तिथे त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार आढळून आला. तरुणीने दागिने आणि पैशांसोबत मिळून १५ लाख रुपयांच्या सामानाची चोरी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

रतन टाटा उतरणार रिटेल मार्केटमध्ये; मुकेश अंबानी यांच्यासोबतच फ्लिपकार्ट अन् ऍमेझॉन पण टेन्शनमध्ये
सचिनची मुलगा सारा तेंडूलकरसोबतच्या नात्यावर क्रिकेटपटू शुभमन गिलने सोडले मौन; स्पष्ट शब्दांच केला नात्याचा…
कोरोनाचा लवकरच गेम ओव्हर! शास्त्रज्ञांनी शोधले स्वस्त आणि मस्त गुप्त हत्यार, जाणून घ्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.