आम्ही येईपर्यंत फक्त ‘अब्बाजान’ म्हणणाऱ्यांनाच रेशन मिळायचे – योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली। उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका फक्त एक वर्षाच्या लांबणीवर आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

अशातच नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमध्ये विकासकामांचं उद्घाटन केलं, यावेळी त्यांनी काँग्रेस ही भारतातील दहशतवादाची जननी आहे आणि ते भगवान राम यांच्यावरील लोकांच्या विश्वासाचा अपमान करतात, अशी खरमरीत टीका केली.

“रोग, बेरोजगारी, माफिया राज आणि भ्रष्टाचार वगळता, काँग्रेस, सपा आणि बसपा सरकारांनी राज्याला काय दिले? असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, विभाजनाच्या राजकारणाला स्थान नाही. २०१७ पूर्वी प्रत्येकाला रेशन मिळत होतं का? पूर्वी जे ‘अब्बा जान’ म्हणत असत त्यांनी गरिबांचे रेशन पचवले,” अशी टीका त्यांनी केली आहे.

“हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला. नेहरूंचा रामावर विश्वास नव्हता. इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला आणि सोनिया गांधींनी रामाचे अस्तित्व नाकारले,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

“देशाला दुखावणाऱ्या लोकांना देशवासियांना सहन करण्याची गरज नाही. काँग्रेस देशातील लोकांना रोग देतंय. तसेच ते प्रभू रामावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा अपमान करून माफियांना आश्रय देते. तर याउलट भाजप नागरिकांना बरे करतो. आम्ही प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करतो आणि माफियांना त्यांची जागा दाखवतोय. भाजप आहे तिथे प्रत्येकासाठी आदर आहे,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

मोदीजींनी देशात तिहेरी तलाक रद्द केला. पण समाजवादी पक्षाचे नेते तालिबानच्या कृत्यांना पाठिंबा देत आहेत. पाकिस्तानचं समर्थक करणाऱ्या देशातील दहशतवाद्यांना आज कुठेही स्थान नाही, असंही आदित्यनाथ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
गृहीणींंसाठी आनंदाची बातमी! आता खाद्यतेलाच्या किंमती होणार कमी, केंद्राची मोठी घोषणा
मोठी बातमी! निलेश राणे उतरणार विधानसभेच्या आखाड्यात? आमदार होऊदे असं गणपतीकडे साकडं 
रिलेशनशिपमुळे ट्रोल होताच ‘तारक मेहता…’फेम मुनमुन दत्ता भडकली; म्हणाली भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय…
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.