भारताने नाकारलेल्या उन्मुक्त चंदची अमेरीकेत तुफानी खेळी; ठोकल्या तब्बल ३०४ धावा

गेल्या काही दिवसांपासून उन्मुक्त चंद हा खेळाडू चर्चेत आहे. त्याला काही दिवसांपूर्वी त्याला दिल्लीच्या संघाने अंतिम ११ मध्ये संधी दिली नाही. तो मैदानावर रणजी खेळण्यासाठी अनेक प्रयत्न करत होता. मात्र त्याला संधी दिली जात नव्हती. मात्र त्याने सध्या भारताबाहेर आपल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे.

उन्मुक्त सध्या अमेरिकेतील मायनर क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. आता तो जोरदार खेळ करत असून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने आपल्या संघाला शिकागो ब्लास्टर्सविरुद्ध ९ विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे. यामुळे आता तो आपल्याकडे हवा होता असे सर्वांना वाटत आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. तेव्हा तो सर्वांच्या नजरेत आला होता. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली आणि मुंबईच्या संघांचे प्रतिनिधित्वही केले होते. मात्र गेल्या काही काळापासून त्याला संधी दिली जात नव्हती. यामुळे त्याने दुसरा पर्याय म्हणून अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.

आता उन्मुक्तने जोरदार फलंदाजी करताना ६३ चेंडूत नाबाद ९० धावा केल्या. त्याने आपल्या डावात १० चौकार आणि ३ षटकार ठोकले. उन्मुक्तने मायनर लीगमध्ये आतापर्यंत ८ सामन्यांत ६०.८० च्या सरासरीने ३०४ केल्या आहेत. यामुळे तो पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेत पडला आहे. उन्मुक्त चंदसोबत वेस्ट इंडिजचा फलंदाज नरसिंह देवनारायणनेसुद्धा जबरदस्त फलंदाजी केली आहे.

त्याने या स्पर्धेत आतापर्यंत तीन अर्धशतके ठोकली आहेत. त्यात त्याची सर्वोच्च नाबाद ९० एवढी राहिली. ज्याला दिल्लीकडून रणजी सामन्यासाठी नाकारले गेले, तो आता अमेरिकेत चांगले प्रदर्शन करत आहे.

ताज्या बातम्या

सलाम! गरीबांच्या लेकरांना शिकवण्यासाठी रोज २५ किमीचे डोंगर पार करून जाते ही शिक्षीका

सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा नवीन म्यूझिक व्हिडिओ होणार लवकरच रिलीज; फोटो पाहून चाहते भावुक

साऊथचे ‘हे’ कलाकार आहेत 100 कोटी क्लबचे राजे; माहित नसेल तर जाणून घ्या साऊथचा सलमान खान?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.