अनलॉक ४; १ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात ‘या’ सर्व गोष्टी

मुंबई | राज्यात कोरोनाच्या संकटाने मागील पाच महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते, मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जनजीवन सुरळीत करण्यासाठी आता १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ सुरू होणार आहे. सध्या अनेक राज्यात साप्ताहिक लॉकडाऊन सुरू आहे. तर अनलॉक ४ प्रक्रियेत अनेक गोष्टी सुरू करता येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार सोशल डिस्टनसिंग आणि इतर नियमावली आखून चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी देऊ शकते. तसेच अनलॉक ३ च्या वेळीच चित्रपटगृहे सुरू करण्याची चर्चा होती.

तसेच अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी देण्याचे म्हटले जात असले, तरी मॉल्समधील चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता कमी आहे.

१ सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसेच यावेळी एका बोगीत ५० टक्के प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

अनेक राज्यांमधील शाळा अजून बंदच आहे. काही दिवसांपासून केंद्रीय पातळीवर शाळा सुरू करण्यासंदर्भात आढावा घेणे सुरू आहे, त्यामुळे १ सप्टेंबरपासून शाळा सुरू केल्या जाऊ शकतात.

जिल्हा, राज्याच्या सीमा १ सप्टेंबरपासून खुल्या होऊ शकतात. कारण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घातले गेलेले आहेत.

दरम्यान, राज्यातंर्गत आणि राज्याराज्यातील वाहतुकीवर निर्बंध असल्याने याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. ही गोष्ट केंद्रीय गृहमंत्रालयानेच राज्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे, त्यामुळे १ सप्टेंबरपासून प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध पुर्णपणे हटवले जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

-अनलॉक ४; १ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात ‘या’ सर्व गोष्टी

-७३ दिवसात नाही! सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले ‘या’ दिवशी येणार कोरोना लस

-लढा कोरोना विरुद्ध ! कोरोनावरील लस कधी येणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली वेळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.