अनलिमीटेड! फक्त एक रूपया द्या आणि कितीही खा; पहा कशी चालते ही श्याम की रसोई

कोरोनामुळे लोकांची घरे उध्वस्त झाली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना साधे दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. गरीब लोकांना मदत करण्यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घेतला होता. अनेक लोक उपाशीपोटी झोपावे लागत होते.

पण केवळ काही लोकांमुळे त्यांना एक वेळचेतरी जेवण मिळत होते. आज तुम्हालाही अशाच एका व्यक्तीविषयी सांगणार आहोत. त्याने गरिबांना अन्न देऊन रात्री उपाशीपोटी झोपणाऱ्या गरिबांना मदत केली आहे. या व्यक्तीने केवळ एक रुपयांत गरिबांना पोटभर जेवण दिले आहे.

नांगलोईच्या गल्लीतील श्याम रसोई येथे रोज सकाळी ११ ते १ दरम्यान फक्त १ रुपयाला थाळी मिळते. श्याम रसोईच्या बाहेर फक्त गरीबच नाही तर सगळ्या वर्गाचे जेवण करत असतात. ANI ने दिलेल्या माहितीनुसार ५१ वर्षीय प्रवीण कुमार गोयल हे गेल्या दोन महिन्यांपासून श्याम रसोई चालवत आहेत.

प्रवीण म्हणाले की, आम्ही १००० ते ११०० लोकांना जेवायला घालतो. तीन रिक्षांच्या मदतीने इंद्रलोक, साई मंदिरसारख्या परिसरात पार्सल उपलब्ध करून देतात. श्याम रसोईच्या माध्यमातून २००० दिल्लीतील माणसे जेवण करतात. आम्हाला विविध लोकांकडून दान मिळते.

बरेच लोक डिजिटल पद्धतीने मदत करतात. आमच्याकडे एवढे रेशन आहे की, आम्ही सात दिवस जेवण देण्याची क्षमता आहे. मी सर्वांना विनंती करतो की, त्यांनी रेशन देऊन ही सेवा चालू ठेवावी. सध्या प्रवीण कुमार गोयल यांच्याकडे ६ मदतनीस काम करतात.

याआधी त्यांच्या थाळीची किंमत १० रुपये होती. पण सध्या चालू असलेल्या परिस्थितीत त्यांनी किंमत कमी करून फक्त १ रुपये ठेवली आहे. या कामासाठी त्यांना व्यापारी रणजित सिंह यांनी एक दुकान दिले आहे. रणजितसिंह म्हणाले की, आम्ही कोणाकडून रोख पैसे घेत नाही.

सगळे दान डिजिटल माध्यमातून होते. इथे काही लोक नियमितपणे जेवायला येतात. त्यातच आम्ही आनंदी आहोत. या सर्वांनी दाखवून दिले आहे की, मोठे काम करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते फक्त काही लोकांच्या मदतीची गरज असते.

महत्वाच्या बातम्या
तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे
आता गाडी विकत घेण्याची गरज नाही; मारुती-सुझुकीने आणलीये भन्नाट ऑफर
मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण
एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्यानं अख्ख पोलीस स्टेशन सस्पेंड केलं होतं; वाचा पुर्ण किस्सा
एका रात्रीत लोकप्रिय झालेल्या रानू मंडलची आज काय अवस्था झाली बघा, वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.