कंगना राणावतची बोलती बंद करणाऱ्या दिलजीत दुसांजची खरी कहाणी वाचा

सध्या सोशल मीडियावर पंजाबी अभिनेता दिलजीत डोसांज खुप जास्त चर्चेत आहे. गेले दोन दिलजीत आणि कंगना राणावतमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यामुळे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

दिलजीत प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला किंग ऑफ पंजाबी सिनेमा बोलले जाते. पंजाबीसोबतच त्याने बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. आज आपण दिलजीत डोसांजबद्दल जाणून घेणार आहोत.

दिलजीतचा जन्म जालंधर जिह्यातील एका छोट्या गावात झाला होता. दिलजीतने त्याचे शालेय शिक्षण जालंधरमध्ये पुर्ण केले. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी लुंधियानाला गेला. लुंधियामध्ये दिलजीतने त्याचे कॉलेजचे शिक्षण केले.

दिलजीत लहानपणापासूनच खुप मस्तीखोर होता. म्हणून त्यांचे आई वडील त्याला नेहमीच ओरडायचे. शाळेत असताना दिलजीतने हार्मोनियम आणि तबला वाजवला आहे. त्यामुळे त्याला संगीतात आणि डान्समध्ये खुप जास्त रुची निर्माण झाली होती.

दिलजीतच्या घरातील आर्थिक परिस्थिती खराब होती. म्हणून त्याने कॉलेजचे शिक्षण अपुर्ण ठेवले आणि काम करायला सुरुवात केली. याच कालावधीत दिलजीतची ओळख राजेंद्र सिंगसोबत झाली. त्यानंतर २००३ मध्ये दिलजीतने पहिल्यांदा पंजाबी संगीत विश्वात पाऊल ठेवले.

२००४ मध्ये दिलजीतचा पहिला पंजाबी साँग अल्बम रिलीज झाला. या गाण्याला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दिलजीतने इश्क हो गया, दिल, चॉकलेट अशा अनेक गाण्यांचे अल्बम काढले. हे सर्व अल्बम खुप जास्त प्रसिद्ध झाले.

एक यशस्वी संगीतकार आणि गायक झाल्यानंतर दिलजीतने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. २०११मध्ये त्याने ‘द लायन पंजाबी’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. पण या चित्रपटातील गाणे सुपरहिट झाले होते.

त्यानंतर दिलजीतने जट अँड जुली, सडी लव्ह स्टोरी, डिस्को सिंग, पंजाब 1984, सुपरसिंग, सरदारजी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दिलजीतचे अनेक चित्रपट हिट झाले होते. म्हणून दिलजीतला किंग ऑफ पंजाबी सिनेमा बोलले जाते.

पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाल्यानंतर दिलजीतने बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला. दिलजीतने हिंदीमध्ये सुरमा, उडता पंजाब, फिलौरी, अर्जून पटियाला, सूरज पे मंगल भारी, अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेता आणि सिंगरच नाही तर दिलजीत चांगला समाजसेवक देखील आहे. २०१३ मध्ये त्याने ‘सांज’ नावाने एक संस्था सुरू केली आहे. या सांज संस्थेत तो अनाथ मुलं आणि वृद्धांची मदत करतो. दिलजीत आज फक्त पंजाबी फिल्म इंडस्ट्रीच नाही तर सगळ्या भारतात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘रंगीला’ गर्ल ऊर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याला तुम्ही पाहिले नाही? पहा फोटो

फक्त दहा चित्रपटांमध्ये रश्मीका मंदाना कशी झाली साऊथची टॉपची अभिनेत्री

‘आशिकी’ फेम अभिनेता राहूल रॉयवर बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या फिदा

वाचा रमेश व सीमा देव या सर्वाधिक गाजलेल्या जोडीची लव्हस्टोरी..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.