जाणून घ्या कोण आहे जसप्रीत बुमराहला क्लीन बोल्ड करणारी संजना गणेशन?

आपल्या फास्ट बॉल्सने अनेकांची झोप उडवणारा भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह अखेर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने त्याच्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

अनेकांनी कमेंट्स करुन नवविवाहीत जोडीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बुमराहने संजना गणेशनसोबत विवाह केला आहे. लग्नाची बातमी आल्यानंतर सर्वांना प्रश्न पडला आहे की, संजना गणेशन नक्की आहे तरी कोण? चला तर मग जाणून घेऊया नक्की कोण आहे संजना गणेशन.

संजना मुळची पुण्याची आहे. तिने पुण्यातूनच तिचे शिक्षण पुर्ण केले आहे. संजना आलाना इन्स्टिट्युुट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर गणेशन रामास्वामीची मुलगी आहे. तिने पुण्यातील सिंबोसिस शिक्षण पुर्ण केले आहे. तिने इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे.

पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर संजना मॉडेलिंगकडे वळली. तिने अनेक दिवस मॉडेलिंग केली. मॉडेलिंगमध्ये यश मिळाल्यानंतर ती टेलिव्हिजन विश्वाकडे वळली. एमटिव्हीवरील Spitsvilla कार्यक्रमामध्ये तिने सहभाग घेतला होता. त्या कार्यक्रमामूळे ती चांगलीच प्रसिद्धझोतात आली होती. पण खुप कमी वेळात ती त्या कार्यक्रमामधून बाहेर झाली होती.

त्यानंतर संजनाने स्पोर्टस ऍंकर म्हणून काम करायला सुरुवात केली. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने ऍंकर म्हणून काम केले आहे. ती स्टार स्पोर्टर्सचा प्रसिद्ध चेहरा आहे. २०१६ पासून ती ऍंकर म्हणून काम करत आहे. बुमराह आणि तिची पहीली भेट देखील क्रिकेटच्या मैदानावरच झाली होती.

क्रिकेटच्या मैदानावर बुमराह आणि संजनाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली आणि आज त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले आहे. तिने बुमराहच्या अनेक मुलाखतीमध्ये घेतल्या आहेत. बुमराह आणि संजनाचा मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २०२० च्या अवॉर्ड सेरिमिनीचा आहे.

क्रिकेटच्या मैदानावर सुरु झालेली ही प्रेम कहानी आत्ता लग्नापर्यंत येऊन पोहोचली आहे. इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत बुमराहने लिहीले आहे की, ‘प्रेम जर खरे असेल तर तुमचे आयूष्य बदलून टाकते. आम्ही एकत्र आमच्या नवीन प्रवासची सुरुवात करत आहोत. आज आमच्या आयूष्यातील सर्वात आनंदी दिवस आहे आणि हा आनंद आम्ही तुमच्यासोबत वाटत आहोत’.

महत्वाच्या बातम्या –

चाहत्यांना दिसला नेहा कक्करचा कातिलाना अंदाज; फोटो पाहून तुम्हीही व्हाल पागल

खलनायक अमरीश पुरी यांच्या मुलीसमोर सारा आणि जान्हवी देखील पडतील फिक्या; पहा फोटो

शाहरुख खानची पत्नी बनायला ऐश्वर्याने दिला होता नकार; म्हणाली, हा तर…

करिश्मा कपूर नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे अक्षय खन्नाचे पहीले प्रेम; नाव वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.