Share

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेने भारताचे पुन्हा केले कौतुक, पंतप्रधान मोदींचे आभार मानत म्हणाले..

joe-bidean-and-pm-modi

सध्या रशिया(Russia) आणि युक्रेनमध्ये(Ukren) भयंकर युद्ध सुरु आहे. यादरम्यान संयुक्त राष्ट्रांमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या चर्चेत भारत अनुपस्थित राहत आहे. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारत रशियाविरोधात तटस्थ भूमिका घेत आहे. साहजिकच ही गोष्ट अमेरिकेला खटकत आहे. त्यामुळेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि सिनेटर भारतासोबतची आपली नवीन मैत्री मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.(united state praises India again)

दोन्ही देशांमधील वाढत्या मैत्रीबद्दल अमेरिका भारताचे लोक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहे, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ सिनेटरने म्हंटले आहे. अमेरिकेच्या सिनेटरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत-अमेरिका मैत्रीबद्दल आभार मानले आहेत. दहशतवादविरोधी सिनेट फॉरेन रिलेशन्सपसमितीचे अध्यक्ष सिनेटर ख्रिस मर्फी यांनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांबद्दल वक्तव्य केलं आहे.

“यापूर्वी अमेरिका-भारत संबंध कधीही मजबूत राहिलेले नाहीत. संयुक्त राज्य अमेरिका आपल्या वाढत्या मैत्रीसाठी भारताच्या लोकांचे आणि पंतप्रधान मोदींचे आभारी आहे”, असे सिनेटर ख्रिस मर्फी म्हणाले आहेत. भारत-अमेरिका संबंधांवर सिनेटर्स काँग्रेसच्या सुनावणीत बोलताना म्हणाले की, “भारत आणि अमेरिका या देशांमधील द्विपक्षीय संबंध वाढत आहेत.”

सिनेटर्स काँग्रेसच्या सुनावणीत पुढे म्हणाले की, “आजपासून पाच वर्षांनी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. भारत ही जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या वर्षी भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था होती.” दहशतवादविरोधी सिनेट फॉरेन रिलेशन्सपसमितीचे अध्यक्ष सिनेटर ख्रिस मर्फी यांनी देखील भारताचे कौतुक केलं आहे.

सिनेटर ख्रिस मर्फी भारताचे कौतुक करताना म्हणाले की, “भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. जागतिक महामारीच्या काळात भारताचा बायोफार्मास्युटिकल उद्योग खूप वाढला आहे. भारताने कोरोनाच्या काळात अमेरिका आणि उर्वरित जगामध्ये PPE किट पुरवले आहेत. या काळात लसींचा प्रमुख उत्पादक देश म्हणून भारत उदयास आला आहे.”

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश निश्चितपणे अमेरिकेसाठी फायदेशीर ठरेल, असेही ख्रिस मर्फी म्हणाले आहेत. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधातील ठरावावर मतदान करताना तटस्थ भूमिका घेतली होती. रशियाने व्हेटो वापरून हा प्रस्ताव फेटाळला होता. या भूमिकेबद्दल रशियाने भारताचे आभार मानले होते.

महत्वाच्या बातम्या :-
५० किलोमीटरसाठी ६० हजार रुपये देऊन पोलंडला पोहोचला भारतीय विद्यार्थी, युक्रेन बॉर्डरवर कोणच करेना मदत
चेन्नई सुपर किंग्सचे १४ कोटी गेले पाण्यात, ‘हा’ स्टार खेळाडू नाही खेळू शकणार आयपीएल? धोनीला झटका
दिलासादायक! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशियाने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now