Share

Union Bank of India : युनियन बँकेत 250 जागांसाठी भरती! पगार 93000, ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख

Union Bank of India : देशभरातील नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) ने स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) पदांसाठी तब्बल 250 जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 93,960 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 आहे.

रिक्त पदांची माहिती

  • पदाचे नाव: वेल्थ मॅनेजर (Wealth Manager) – स्पेशलिस्ट ऑफिसर

  • एकूण जागा: 250

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • शैक्षणिक पात्रता: MBA, MMS, PGDBA, PGDBM, PGPM किंवा PGDM उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • अनुभव: संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • सामान्य उमेदवार: 25 ते 35 वर्षे (1 ऑगस्ट 2025 रोजी)

  • SC/ST उमेदवार: वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट

  • OBC उमेदवार: वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट

पगार आणि सुविधा

  • पगार: रु. 64,820/- ते रु. 93,960/- प्रतिमहिना

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात कुठेही नेमणूक होऊ शकते.

अर्ज प्रक्रिया

  1. उमेदवारांनी www.unionbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी.

  2. अर्ज भरताना योग्य माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

  3. परीक्षा आणि निवड प्रक्रियेबाबतची माहिती नंतर कळवली जाईल.

परीक्षा शुल्क

  • सामान्य/OBC: ₹1180/-

  • SC/ST/PWD: ₹177/-

महत्त्वाची तारीख:

  • अर्जाची शेवटची तारीख:25 ऑगस्ट 2025

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now